200 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 131 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू
Monday, October 5, 2020
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार
संघाची
मतदान केंद्राची प्रारूप यादी आज प्रसिध्द
हरकती व सूचना 13 ऑक्टोंबर पर्यंत स्विकृत
नांदेड (जिमाका) दि. 5 :- औरंगाबाद
विभागीय आयुक्त
यांनी दिलेल्या निर्देशानुसार 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक-
2020 साठी निश्चित करण्यात आलेल्या
मतदान केंद्राची प्रारूप यादी व सुचना पत्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्ह्याच्या https://nanded.gov.in/ या वेब पोर्टलवर मंगळवार 6 ऑक्टोंबर 2020
रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रसिध्द करण्यात आलेली 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक-
2020 च्या मतदान केंद्राची प्रारूप यादी
वरील संबंधित कार्यालयात तसेच वेबपोर्टलवर अवलोकनासाठी उपलब्ध असेल. या यादी बाबत
काही हरकती व
सुचना असतील तर अशा सुचना
व हरकती यादी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 7
दिवसापर्यंत म्हणजेच
दिनांक 13 ऑक्टोंबर 2020
रोजी पर्यंत
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांचे कार्यालयात दाखल करता येणार आहेत,
असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड कौठा येथे 30 एकरवर
आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल
- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 5 :-जिल्ह्यातून विविध क्रीडा प्रकार, खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी त्यांना चांगल्या क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंना यासाठी आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. युवकांना क्रीडा सुविधांसह चांगले प्रशिक्षकही मिळावेत यासाठी आग्रही भुमिका मांडत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौठा येथे 30 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय आज जाहिर केला.
क्रीडा संकुल विकासाबाबत आज नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार उपस्थित होते.
नांदेड येथे विविध खेळांसाठी एक अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल असावे अशी अनेक दिवसांपासून विविध क्रीडा संघटना, खेळाडू, क्रीडाप्रेंमीची मागणी होती. ही मागणी विचारात घेऊन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्णय घेतला. सद्यस्थितीत नांदेड शहरात अद्ययावत क्रिकेटच्या स्टेडिअमचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. क्रिकेटसमवेत इतर खेळांच्या विविध स्पर्धा व सरावासाठी स्वतंत्र जिल्हास्तरावरील नवीन स्टेडिअम जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना नवी दिशा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन कौठा येथे तीस एकर जागेमध्ये आता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आकार घेईल. यात सिन्थेटिक ॲथलेटिक्स मैदान, स्विमिंगपूल, बॅटमिंटन हॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, जिमनॅस्टिकसाठी हॉल, ज्यूदो कराटे, पॉवर लिफ्टींग, बास्केट बॉल, स्केटिंग, आर्चरी, तॉयक्कोंदो, कुस्ती अशा विविध खेळांचे अद्ययावत व प्रमाणित आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असतील. याचबरोबर क्रीडापटूंच्या अंगी आंतराष्ट्रीय दर्जाचे कसब यावे यादृष्टिने नियमित सराव शिबीर स्पर्धा घेण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सेवासुविधांचाही समावेश राहिल.
नवीन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील क्रीडा विकासाबाबत आता स्वतंत्र समिती तयार करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध अध्यक्षपदी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती केली. सदर तीस एकर जागा या नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलासाठी तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत योग्यती प्रक्रिया करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. यात आवश्यकता भासल्यास मनपाने योग्य ती मदत करण्याबाबत आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनाही सांगितले. जागेची पाहणी करुन नियोजित आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शासकीय क्रीडा संकुल याचे व्यवस्थापन व त्याची निगा घेण्यासाठी व्यावसायिक तत्वावर विचार करण्याशिवाय पर्याय नाही. पुणे, मुंबई येथे विविध खेळांचे क्लब व तेथील व्यवस्थापन लक्षात घेता त्याच धर्तीवर नांदेड येथील हे क्रीडा संकुल राहील असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, किशोर पाठक, डॉ. मनोज पैजणे, डॉ. आश्विन बोरीकर, प्रलोभ कुलकर्णी, विक्रांत खेडकर, जयपाल रेड्डी, बालाजी जोगदंड, प्रविण कुपटीकर, मंगेश कामतीकर, अलीम खान, इम्रान खान, प्रा. इंम्तियाज खान, रविकुमार बळवाड यावेळी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयाचे स्वागत विविध क्रीडा संघटना, पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी यांनी केले व तात्काळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार देखील केला.
0000
सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान
नांदेड (जिमाका) दि. 5 :- नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार घोषित झाला आहे. इयत्ता 10 मध्ये शिकणाऱ्या या बालविराने स्वत:च्या जीवाचा पर्वा न करता जिगरबाज कामगिरीने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन व्यक्ती व 40 शेळयांचा जीव वाचविण्याचे शौर्य दाखविले आहे. या बालविराला हा पुरस्कार आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरणाच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. काळम, सहाय्यक लेखा अधिकारी, जी.आर. धुमे, परिविक्षा अधिकारी बी.पी. बडवणे यांची उपस्थिती होती.
भारत सरकार,
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जीवनरक्षा पदक पुरस्कार शिवराज रामचंद्र
भंडारवाड यांना घोषित झालेला होता. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, पदक व 1 लाख रुपयाचा धनादेश असे आहे. हा पुरस्कार ज्या मुलांनी शिक्षण,
कला, सांस्कृतिक कार्य, नाविण्यपुर्ण
शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष
नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना दिला जातो.
त्यांच्या या धाडसाचे कौतुक व्हावे व समाजातील इतर बालकांनाही त्याच्यापासून
प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार महत्वाचा आहे.
00000
शेतकऱ्यांबाबत भेदभाव सहन करणार नाही
- पालकमंत्री अशोक चव्हाण
पिक विमा कंपन्यांच्या चौकशीसाठी
समिती स्थापन करण्याचे दिले निर्देश
नांदेड (जिमाका) दि. 5 :- मोठ्या कष्टातून शेतकरी पेरणीसाठी आर्थिक तरतूद करतो. नैसर्गिक
आपत्तीचा धोका शेवट पर्यंत असल्याने पीक हाती येईपर्यंत त्याच्या जीवात-जीव नसतो.
संभाव्य धोके लक्षात घेऊन मोठ्या मुश्कीलीने तो पीक विम्याची रक्कम उभी करतो. एवढे
सारे करुनही केवळ तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही
सारी प्रक्रियाच गांभीर्याने तपासून पहावी लागेल, असा संतप्त इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन
भवनात आयोजित केलेल्या पीक विमा, अतिवृष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन
इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा
ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब
कदम रावणगावकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे,
पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देतांना
जवळ-जवळच्या गावातही वातावरण बदलाचे तांत्रिक कारण देत भेदभाव करुन विमा देणे
सोयीने टाळल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी माझ्याकडे दिल्या आहेत. यात
बारड, मुदखेड, वसरणी,
आष्टी, हदगाव, लिंबगाव,
तरोडा, अर्धापूर, दाभड,
निवघा, मुगट आदी गावातील केळी उत्पादक
शेतकऱ्यांचा समावेश आहे. सदर तक्रारीमध्ये मी तपास केला असता त्यात तथ्य दिसून
येते. अवघ्या दहा किलो मीटरच्या परिघात उष्णता व हवेच्या वेगाचा फरक दाखवून
शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून डावले आहे. याचबरोबर काही ठरावीक दिवसांच्या
नोंदी जाणीवपूर्वक विमा कंपनीने घेण्याचे टाळले असे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले
आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीशी निगडीत हा
एैरणीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही अधिक गंभीर आहोत. जिल्ह्यातील विविध
मंडळात असलेल्या या हवामान तपासणी यंत्राची अवस्था, त्यातून नोंदली जाणारी हवामानाची आकडेवारी व केवळ याच्या
आधारे पिक विमा कंपन्यांकडून ठरविली जाणारी नुकसान भरपाई व सोईचे अहवाल या साऱ्या
व्यवस्थेबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी
शासन निर्णयाप्रमाणे चौकशी समिती गठीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषि सभापती, सर्व उपविभागीय अधिकारी, गृह पोलीस उपअधिक्षक,
विमा प्रतिनिधी यांचा समावेश करण्याबाबत सुचविले. ही समिती येत्या
दहा दिवसात मंडळ निहाय वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करेल, असेही
त्यांनी स्पष्ट केले.
एकमेकाशेजारी असलेल्या गावात हवामानात
दाखविण्यात येत असलेला बदल किती योग्य ठरवणार असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित
केला. बऱ्याच शेजारी असलेल्या गावात हवामानातील बदल दाखवून भेदभाव झाल्याच्या
तक्रारीबाबत त्या-त्या गावांच्या एरिअल अंतराबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम
विभागाने तयार करावा, असेही
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले.
00000
लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...