Monday, October 5, 2020

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची

मतदान केंद्राची प्रारूप यादी आज प्रसिध्द

हरकती व सूचना 13 ऑक्टोंबर पर्यंत स्विकृत

नांदेड (जिमाका) दि. 5 :- औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक- 2020 साठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्राची प्रारूप यादी व सुचना पत्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डवर तसेच जिल्ह्याच्या https://nanded.gov.in/ या वेब पोर्टलवर मंगळवार 6 ऑक्टोंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

प्रसिध्द करण्यात आलेली 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक- 2020 च्या मतदान केंद्राची प्रारूप यादी वरील संबंधित कार्यालयात तसेच वेबपोर्टलवर अवलोकनासाठी उपलब्ध असेल. या यादी बाबत काही हरकती सुचना असतील तर अशा सुचना हरकती यादी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसापर्यंत म्हणजेच दिनांक 13 ऑक्टोंबर 2020 रोजी पर्यंत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांचे कार्यालयात दाखल करता येणार आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...