प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने
हेल्मेट जनजागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि 30 :-प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने हेल्मेटचा वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर केला त्यांचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुलाबपुष्प देवून नुकतेच अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्रादेशिक अधिकारी अविनाश राऊत, संदीप निमसे, मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, रत्नकांत ढोबळे, पद्माकर भालेकर, सेमावानी, गवळी, राजूरकर, जारवाल, गाजुलवाड, कंधारकर, देवदे, पवळे, बुरकुले यांची उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्यावतीने परिपत्रक काढण्यात आले आहे. शहरातील एसजीजीएस कॉलेज, आयटीआय येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगण्यात आले. सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी
यांना हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगण्यात आले. नो
हेल्मेट नो इन्ट्रीचे बॅनर व माहितीपत्रक शासकीय कार्यालयापुढे लावण्यात आले आहे.
31 मार्च पासून नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण प्रबोधनपर विविध कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. तर 1 एप्रिल 2022 पासून कडक हेल्मेट तपासणी मोहिम राबविण्यात
येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी
पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000