Thursday, April 6, 2017

"उज्ज्वल नांदेड"चे यश प्रेरणादायी
- प्रा. कपिल हांडे
नांदेड दि. 6 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणारे प्रयत्न याद्वारे मिळत असलेले यश पाहू "उज्ज्वल नांदेड" मोहिम ही इतर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील विषयतज्ज्ञ प्रा.कपिल हांडे  यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने आयोजित दरमहा 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते.
विविध स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्पर जिल्हाधिकारी  संतोष पाटी तर प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी  अंकूश पिनाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, शैलेश झरकर यांची उपस्थित होत.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, मार्गदर्शन शिबी, सराव परीक्षा अभिरुप मुलाखत याद्वारे सक्षम करण्यात येत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन परीक्षेस सामोरे जाण्याचे आवाहन केले. उपजिल्हाधिकारी श्री. पिनाटे यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवले. प्रमुख व्याख्याते प्रा. हांडे यांनी मराठी व्याकरण, परीक्षाभिमुख कायदे उत्पादन शुल्क विभागाच्या र्व परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी "उज्ज्वल नांदेड" मोहिमेतंर्गत राबविण्यात आलेल्या मार्गदर्शन तथा प्रतिरुप मुलाखत यात सहभागी होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यामध्ये दिवाणी न्यायाधी तथा प्रथमवर्ग दंडधिकारी पदी निवड झालेले अॅड. इरफान खान अॅड. सरवरी कदीर अहेमद, सहाय्यक निबंधक तथा विक्रीकर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया डांगे, अधिव्याख्यातापदी  निवड झालेले श्रीमती करुणा आवरगंड, राजेश गोरे, लिंगूराम राजुरे श्रीमती आशाताई लोहटे, राजाराम टकले, सिध्देश्वर कांबळे, शिवाजी साखरे, श्रीमती सुधाताई मेश्राम, श्रीमती शितल शिदे, चंद्रकांत धुमाळ, प्रकाश सिरसे तसेच विक्रीकर सहाय्यक पदी निवड झालेले अमोल बालाजी पाकलवाड, अनिता सोनाजी भालेराव, गणेश तुळशीराम सर्जे, सय्यद जुबेर रहेमतुल्ला शिवकुमार सोनवळे, संजय इसानकर यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यात्याचे स्वागत ग्रामगिता देवून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे तर सुत्रसंचलन आरती कोकुलवार यांनी केले. शिबी यशस्वीतेसाठी प्रताप सुर्यवंशी, अजय ट्टमवार, कोंडिबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, लक्ष्मण शन्नेवाड, अभिजीत पवार, सोपान यनगुलवाड आदीने संयोजन केले.
000000

जालना येथे 27 एप्रिल ते 7 मे दरम्यान  
नऊ जिल्ह्यांसाठी  सैन्य भरती
नांदेड दि. 6 :- सैन्यभरती कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने जालना येथे सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. सैन्य भरती 27 एप्रिल ते 7 मे 2017 दरम्यान जालना येथे होणार आहे. भरती नांदेड, परभणीहिंगोली, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, जळगांव, धुळे व नंदूरबार अशा नऊ जिल्हयांसाठी होत आहे. या सैन्यभरती मेळाव्यात सोल्जर जीडी,  सोल्जर टेक्नीकल,  सोल्जर क्लार्क / स्टोर किपर, सोल्जर ट्रेडसमॅन या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी 7 मार्च ते 11 एप्रिल 2017 दरम्यान www.joinindianarmy या संकेतस्थळावर करावी लागणार आहे. या संकेतस्थळावर भरती संबधी संपूर्ण माहिती  असल्याचेही  सैन्यभरती अधिकारी  औरंगाबाद यांनी  कळविले आहे. भरतीसाठी वयोमर्यादा 1 ऑक्टोंबर 2017 या दिनांकावर गृहीत धरली जाणार आहे.
            भरतीसाठी पात्रता- सोल्जर जीडी साठी - वय साडेसतरा ते  21 वर्षेउंची- 168 से.मी., वजन 50 किलो छाती 77 ते 82, शैक्षणिक पात्रता-10 वी उत्तीर्ण 33 टक्के प्रत्येक विषयात तसेच सर्व विषय मिळून  45 टक्के मार्कस असावे. उमेदवार 12 वी उत्तीर्ण किंवा त्याहून अधिक शैक्षणिक पात्रतेचा असल्यास टक्केवारीची अट नाही.
सोल्जर टेक्नीकल - वय साडेसतरा ते  23 वर्षे, उंची-167 से.मी., वजन 50 किलो छाती 76 ते 81, शैक्षणिक पात्रता- बारावी उत्तीर्ण भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित तसेच इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असावा. एकूण गुणांची टक्केवारी 45 टक्के असावी. ( प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण असावेत.)
सोल्जर लिपीक तथा स्टोअर किपरसाठी- वयसाडेसतरा ते 23 वर्षे, उंची- 162 से.मी., वजन 50 किलो छाती 77 ते 82 शैक्षणिक पात्रता- गणीत किंवा अकौंटन्सी विषयात 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात 50 टक्के गुण असावेत. तसेच इंग्लीशसह गणीत किंवा अकौंटन्सी किंवा बुककिपींग या विषयात दहावी किंवा बारावीत कमीत कमी 50 टक्के गुण असावेत. उमेदवार पदवीधर किंवा उच्च शैक्षणिक पात्रतेचा असलातरी त्याचे दहावी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातील.
सोल्जर ट्रेडस मॅन- वय साडेसतराते 23 वर्षे, उंची- 168 से.मी., वजन 48 किलो छाती 76 ते 81,  शैक्षणिक पात्रता– 10 वी उत्तीर्ण. कोणत्याही प्रकारची टक्केवारी अट नाही.
सोल्जर ट्रेडसमन- वय साडेसतराते 23 वर्षे, उंची- 168 से.मी., वजन 48 किलो छाती 76 ते 81,  शैक्षणिक पात्रताआठवी उत्तीर्ण. कोणत्याही प्रकारची टक्केवारी अट नाही.
कागदपत्रे - प्रामुख्याने दहावी, बारावीचे, उच्च शिक्षणासंबंधीचे मुळ व झेरॉक्स प्रमाणपत्रे, टीसी किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड, रहिवाशी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सैनिक किंवा माजी सैनिक यांच्याशी असलेल्या नातेसंदर्भाबाबत प्रमाणपत्र, 14 पासपोर्ट फोटो 5 बाय 4 सेंमीचे रंगीत छायाचित्रे इत्यादी आवश्यक आहेत.   
खेळाडुंसाठी शारीरीक क्षमतेच्या चाचणी विहित केल्याप्रमाणे शिथीलता व अधिकचे गुण दिले जाणार आहेत. ही माहिती तसेच भरती संदर्भातील कागदपत्रांबाबतची माहिती www.joinindianarmy या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 6  :- जिल्ह्यात रविवार 16 एप्रिल 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील उत्सव, मिरवणुकांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 3 एप्रिल 2017 ते रविवार 16 एप्रिल 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
वस्तुस्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर ;
रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
            नांदेड दि. 6 :- विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुस्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर आता रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे.
            शासन निर्णयात दर्शविण्यात आलेल्या वस्तुंची नावे पुढील प्रमाणे आहेत. कृषी निविष्ठा ( जैविक / सेंद्रीय  खते / सूक्ष्म मूलद्रव्ये व अन्य ), भूसुधारके ( जिप्सम व अन्य ), सूक्ष्म सिंचने साधने ( ठिबक, तुषार व अन्य ), शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या व त्यांचे संवर्धनासाठीचे साहित्य, दुग्ध व्यवसायासाठीचे साहित्य. संरक्षित शेतीसाठीचे साहित्य. अच्छादन व अस्तरीकरण साहित्य. एकात्मिक कीड व अन्न व्यवस्थापनसाठीच्या निविष्ठा. कृषी प्रक्रियेसाठीचे साहित्य व उपकरणे. रेशीम उत्पादनासाठीचे साहित्य व उपकरणे, कृषी माल हाताळणी व वाहतूक सामग्री. आवेष्टन, संकलन व प्रतवारी उपकरणे. स्वेटर, शाल, साबण, हेअर ऑईल, झेरॉक्स मशीन, टिनपत्रे या साहित्यांचा शासन निर्णयात समावेश असून याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नियोजन विभागाचे अवर सचिव प्रियंका छापवाले यांनी केले आहे.

00000
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा
नांदेड दि. 6 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत हे शनिवार 8 एप्रिल 2017 व रविवार 9 एप्रिल 2017 रोजी दोन दिवसांच्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी सोलापूर येथून मोटारीने रात्री 7 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह लातूर / नांदेड येथे आगमन व मुक्काम.
रविवार 9 एप्रिल 2017 रोजी सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह लातूर / नांदेड येथून मोटारीने नायगाव (बा) ता. नायगाव जि. नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. नायगाव (बा) ता. नायगाव येथे आगमन व पांडुरंग शिंदे प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी विद्यार्थी परिषद यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- जयराज पॅलेस नांदेड रोड नायगाव (बा.) सकाळी 11 वा. नायगाव (बा.) येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 12.30 वा. नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई बाबत आणि स्वच्छता विभाग, कृषी विभागातील विविध योजनांचा आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5 वा. नंदिग्राम एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्टेशन येथून मनमाडकडे प्रयाण करतील.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...