Thursday, April 6, 2017

जालना येथे 27 एप्रिल ते 7 मे दरम्यान  
नऊ जिल्ह्यांसाठी  सैन्य भरती
नांदेड दि. 6 :- सैन्यभरती कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने जालना येथे सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. सैन्य भरती 27 एप्रिल ते 7 मे 2017 दरम्यान जालना येथे होणार आहे. भरती नांदेड, परभणीहिंगोली, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, जळगांव, धुळे व नंदूरबार अशा नऊ जिल्हयांसाठी होत आहे. या सैन्यभरती मेळाव्यात सोल्जर जीडी,  सोल्जर टेक्नीकल,  सोल्जर क्लार्क / स्टोर किपर, सोल्जर ट्रेडसमॅन या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी 7 मार्च ते 11 एप्रिल 2017 दरम्यान www.joinindianarmy या संकेतस्थळावर करावी लागणार आहे. या संकेतस्थळावर भरती संबधी संपूर्ण माहिती  असल्याचेही  सैन्यभरती अधिकारी  औरंगाबाद यांनी  कळविले आहे. भरतीसाठी वयोमर्यादा 1 ऑक्टोंबर 2017 या दिनांकावर गृहीत धरली जाणार आहे.
            भरतीसाठी पात्रता- सोल्जर जीडी साठी - वय साडेसतरा ते  21 वर्षेउंची- 168 से.मी., वजन 50 किलो छाती 77 ते 82, शैक्षणिक पात्रता-10 वी उत्तीर्ण 33 टक्के प्रत्येक विषयात तसेच सर्व विषय मिळून  45 टक्के मार्कस असावे. उमेदवार 12 वी उत्तीर्ण किंवा त्याहून अधिक शैक्षणिक पात्रतेचा असल्यास टक्केवारीची अट नाही.
सोल्जर टेक्नीकल - वय साडेसतरा ते  23 वर्षे, उंची-167 से.मी., वजन 50 किलो छाती 76 ते 81, शैक्षणिक पात्रता- बारावी उत्तीर्ण भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित तसेच इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असावा. एकूण गुणांची टक्केवारी 45 टक्के असावी. ( प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण असावेत.)
सोल्जर लिपीक तथा स्टोअर किपरसाठी- वयसाडेसतरा ते 23 वर्षे, उंची- 162 से.मी., वजन 50 किलो छाती 77 ते 82 शैक्षणिक पात्रता- गणीत किंवा अकौंटन्सी विषयात 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात 50 टक्के गुण असावेत. तसेच इंग्लीशसह गणीत किंवा अकौंटन्सी किंवा बुककिपींग या विषयात दहावी किंवा बारावीत कमीत कमी 50 टक्के गुण असावेत. उमेदवार पदवीधर किंवा उच्च शैक्षणिक पात्रतेचा असलातरी त्याचे दहावी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातील.
सोल्जर ट्रेडस मॅन- वय साडेसतराते 23 वर्षे, उंची- 168 से.मी., वजन 48 किलो छाती 76 ते 81,  शैक्षणिक पात्रता– 10 वी उत्तीर्ण. कोणत्याही प्रकारची टक्केवारी अट नाही.
सोल्जर ट्रेडसमन- वय साडेसतराते 23 वर्षे, उंची- 168 से.मी., वजन 48 किलो छाती 76 ते 81,  शैक्षणिक पात्रताआठवी उत्तीर्ण. कोणत्याही प्रकारची टक्केवारी अट नाही.
कागदपत्रे - प्रामुख्याने दहावी, बारावीचे, उच्च शिक्षणासंबंधीचे मुळ व झेरॉक्स प्रमाणपत्रे, टीसी किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड, रहिवाशी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सैनिक किंवा माजी सैनिक यांच्याशी असलेल्या नातेसंदर्भाबाबत प्रमाणपत्र, 14 पासपोर्ट फोटो 5 बाय 4 सेंमीचे रंगीत छायाचित्रे इत्यादी आवश्यक आहेत.   
खेळाडुंसाठी शारीरीक क्षमतेच्या चाचणी विहित केल्याप्रमाणे शिथीलता व अधिकचे गुण दिले जाणार आहेत. ही माहिती तसेच भरती संदर्भातील कागदपत्रांबाबतची माहिती www.joinindianarmy या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...