Thursday, April 6, 2017

वस्तुस्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर ;
रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
            नांदेड दि. 6 :- विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुस्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर आता रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे.
            शासन निर्णयात दर्शविण्यात आलेल्या वस्तुंची नावे पुढील प्रमाणे आहेत. कृषी निविष्ठा ( जैविक / सेंद्रीय  खते / सूक्ष्म मूलद्रव्ये व अन्य ), भूसुधारके ( जिप्सम व अन्य ), सूक्ष्म सिंचने साधने ( ठिबक, तुषार व अन्य ), शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या व त्यांचे संवर्धनासाठीचे साहित्य, दुग्ध व्यवसायासाठीचे साहित्य. संरक्षित शेतीसाठीचे साहित्य. अच्छादन व अस्तरीकरण साहित्य. एकात्मिक कीड व अन्न व्यवस्थापनसाठीच्या निविष्ठा. कृषी प्रक्रियेसाठीचे साहित्य व उपकरणे. रेशीम उत्पादनासाठीचे साहित्य व उपकरणे, कृषी माल हाताळणी व वाहतूक सामग्री. आवेष्टन, संकलन व प्रतवारी उपकरणे. स्वेटर, शाल, साबण, हेअर ऑईल, झेरॉक्स मशीन, टिनपत्रे या साहित्यांचा शासन निर्णयात समावेश असून याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नियोजन विभागाचे अवर सचिव प्रियंका छापवाले यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...