Monday, October 15, 2018


महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा (यात्रा थांबा)
17 ऑक्टोंबरला नांदेड येथे
नांदेड दि. 15 :- "महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा" बुधवार 17 ऑक्टोंबर 2018 रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बाबानगर नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित केली आहे. विविध स्तरावरील व्यवसाय / उद्योग यासंबंधीत संकल्पनेसह विद्यार्थी व नव उद्योजकांनी येथे सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
उद्योग मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात 3 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2018 या कालावधीत "महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा"चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या उपक्रमांतर्गत स्टार्टअप व्हॅनच्या माध्यमातून राज्यातील जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थेच्या मदतीने स्टार्टअप व उद्योजकता विषयक जनजागृती स्टार्टअप विश्वातील नामांकित यशोगाथा व उद्योजकता विकास विषयक माहिती देण्यात येणार आहे.
स्टार्टअप या विषयातील मार्गदर्शन, संसाधने, इन्क्युवेटर, ॲक्सेलरेटर यासारखे स्टार्टअपशी संबंधित विविध कार्यक्रम, निधी मिळविण्यासाठी सर्वात महत्वाची प्रक्रिया आणि स्टार्टअपशी इको सिस्टिमकडून स्टार्टअप्सना मिळणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000


दिव्यांग मतदार नोंदणीसाठी
शुक्रवारी नांदेड येथे विशेष शिबीर  
नांदेड दि. 15 :- एक जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या दिव्यांग नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय बालाजी मंदिराच्यामागे, मगनपुरा नवा मोंढा नांदेड येथे शुक्रवार 19 ऑक्टोंबर 2018 रोजी आयोजित शिबिरात दुपारी 12 ते 5 यावेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नोंद करणे व मतदारामध्ये मतदान, निवडणूक विषयी जनजागृतीसह मतदार यादीत दिव्यांग मतदाराचे नाव नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या व ज्या 18 वर्षे पूर्ण दिव्यांग नागरीकांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा सर्व दिव्यांग नागरिकांचे नाव मतदार यादीत नोंद होणे आवश्यक आहे. यासाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड या विद्यालयात शुक्रवार 19 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी 12 ते 5 या कालावधीत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. पासपोर्ट आकाराचे कलर छायाचित्र, रहिवास पुरावा जसे शिधावाटप पत्रिका, वाहनचालन परवाना, पारपत्र, बँकेचे पासबुक इत्यादी. जन्म तारखेचा पुरावा- जन्म प्रमाणपत्र, जन्म तारीख नमूद केलेला शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड व वाहन परवाना इत्यादी. दिव्यांगासाठी काम करणाऱ्या शाळा, संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि स्वयंसेवी संघटनांनी त्यांच्या संलग्नीत दिव्यांग नागरिकांना या शिबिराबाबत माहिती दयावी, असेही आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
000000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात शनिवार 27 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 13 ते 27 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000                            



धर्माबाद येथे रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती
 नांदेड, दि. 15 :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत धर्माबाद येथे जनजागृतीद्वारे विद्यार्थ्यांची रॅली आज काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्लाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोंबर 2018 या काळात नवीन पात्र मतदारांची नाव नोंदणी, दुरुस्ती व मयतांची वगळणी  करण्यात येत आहे.
यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धर्माबाद श्रीमती ज्योती चौहान, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, गटविकास अधिकारी पी. के. नारवटकर, न.पा. मुख्याधिकारी मंगेश देवरे, जि. प. हायस्कुलचे मुख्याध्यापिका भोकरे मॅडम, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, केंद्रप्रमुख अरुण ऐनवाले, सुर्यकांत आंदेलवार, शहरातील बिएलओ  उपस्थित होते.
रॅलीत प्रामुख्याने जि. प. हायस्कुल, हुतात्मा पानसरे हायस्कुल, केशव प्राथमीक शाळा आदिनी भाग घेऊन तालुक्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव नोदविण्याबाबत विद्यार्थ्यांनी घोषणा केल्या. जनजागृती तालुकास्तरावरून ग्रामीण भागात मुख्याध्यापक, शिक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गावोगाव रॅली काढून युवक-युवती, लग्न झालेल्या महिलांनी नाव नोंदणी करण्याबाबत संदेश देण्यात आला.
0000000


जप्‍त केलेल्‍या रेती साठ्याचा लिलाव
शुक्रवारी नांदेड तहसिल कार्यालयात
नांदेड, दि. 15 :- नांदेड तालुक्‍यात विनापरवानगी अनाधिकृत रेती साठा केलेल्या या रेती साठयाचा लिलाव (पहिली फेरी) नांदेड उपविभागीय अधिकारी यांच्‍या अधिपत्‍याखाली शुक्रवार 19 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी  2 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
सदर रेतीसाठा मार्कंड याठिकाणी असून शेतमालकाचे नाव सुदाम नरबा येवले, अब्‍दुल सयद अब्‍दुल खलील असे आहे. अनुक्रमे अंदाजे रेती साठा ब्रासमध्ये 10, 30 अशा एकुण 40 एवढा आहे.  
तसेच रेतीसाठा नागापूर याठिकाणी शेतमालकाचे नाव (कंसात अंदाजे रेती साठा ब्रासमध्ये) अनिल पुयड (43), कोंडिबा मुक्ताजी करडीले (31) व (141), दिगांबर रघुनाथ करडीले, बालाजी पुयड (21), दिगांबर करडीले (35) (27), बालाजी पुयड (119), (77), (99), माधव किशोर मस्के (95). एकुण 688 अंदाजे रेती साठा ब्रासमध्ये आहे.    
नागरिकांनी नांदेड तालुक्‍यात वरील दर्शविलेल्‍या ठिकाणी  रेतीसाठा आहे, तो पाहुन तपासुन लिलावात भाग घ्‍यावा. स्‍थळाच्या ठिकाण असलेला रेतीसाठा तपासनच बोलीत भाग घ्‍यावा. अटी शर्ती अधिक माहिती तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल, असे तहसिलदार नांदेड यांनी कळविले आहे.
000000


कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री
संभाजी पाटील-निलंगेकर यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 15 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.      
मंगळवार 16 ऑक्टोंबर 2018 रोजी मुंबई येथून राज्यपाल महोदयांसमवेत खाजगी विमानाने सकाळी 9.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. राज्यपाल महोदयांसमवेत नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने लातूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.20 वा. लातूर विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2.25 वा. नांदेड विमानतळ येथून राज्यपाल महोदयांसमवेत खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 15 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.      
मंगळवार 16 ऑक्टोंबर 2018 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने लातूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.20 वा. लातूर विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2.25 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...