Monday, October 15, 2018


धर्माबाद येथे रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती
 नांदेड, दि. 15 :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत धर्माबाद येथे जनजागृतीद्वारे विद्यार्थ्यांची रॅली आज काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्लाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोंबर 2018 या काळात नवीन पात्र मतदारांची नाव नोंदणी, दुरुस्ती व मयतांची वगळणी  करण्यात येत आहे.
यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धर्माबाद श्रीमती ज्योती चौहान, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, गटविकास अधिकारी पी. के. नारवटकर, न.पा. मुख्याधिकारी मंगेश देवरे, जि. प. हायस्कुलचे मुख्याध्यापिका भोकरे मॅडम, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, केंद्रप्रमुख अरुण ऐनवाले, सुर्यकांत आंदेलवार, शहरातील बिएलओ  उपस्थित होते.
रॅलीत प्रामुख्याने जि. प. हायस्कुल, हुतात्मा पानसरे हायस्कुल, केशव प्राथमीक शाळा आदिनी भाग घेऊन तालुक्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव नोदविण्याबाबत विद्यार्थ्यांनी घोषणा केल्या. जनजागृती तालुकास्तरावरून ग्रामीण भागात मुख्याध्यापक, शिक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गावोगाव रॅली काढून युवक-युवती, लग्न झालेल्या महिलांनी नाव नोंदणी करण्याबाबत संदेश देण्यात आला.
0000000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...