Friday, April 16, 2021

                                                              जिल्ह्यात किनवटदेगलूर पाठोपाठ

तेरा तालुक्यांच्या ठिकाणी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट

-          पालकमंत्री अशोक चव्हाण

▪ तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणावर अधिक भर

▪ मालेगाव येथे येत्या सोमवार पासून कोविड केअर सेंटरचा प्रारंभ

 


नांदेड (जिमाका) दि. 
16 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणेचे अधिकाधिक सक्षमीकरण करुन ग्रामीण भागात कोविड उपचाराच्या उत्तम वैद्यकीय सुविधा पोहचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ऑक्सिजन उपलब्धतेच्या दृष्टीने जिल्ह्यातील किनवट आणि देगलूरच्या धर्तीवर लवकरच इतर तालुक्यांच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

 


ग्रामिण भागातील रूग्णाला वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास ते जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेतात. त्यामुळे कोरोना बाधितांना तालुक्याच्या पातळीवरच ऑक्सिजनसह योग्य उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक आहेअसे स्पष्ट करुन त्यांनी येत्या सोमवारी मालेगाव येथे व त्यानंतर अर्धापूर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती दिली.  

 

जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेवून सर्वसामान्यांपर्यंत वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या प्रकारे पोहचाव्यात यादृष्टीने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेजिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळेअतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशीडॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिपक म्हैसकरजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेअन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड आदी उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत आरोग्य सुविधा आपण उभ्या केलेल्या आहेत. काही गावांमध्ये या सुविधा कमी पडत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीही आपण उभ्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी काम पूर्णत्वास आले आहे. आरोग्याच्या या मुलभूत सुविधा लक्षात घेवून याठिकाणी कोविड उपचाराच्या दृष्टीने ज्या अत्यावश्यक बाबी आहेतअशा ऑक्सिजन सुविधेसह उपचाराच्या अन्य सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्याच्या सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला दिल्या. 

 

रेमडेसिविर इंजेक्शनची उपब्धता आणि याची आवश्यकता असलेले गंभीर रुग्ण यांचा दररोज आढावा घेवून नियोजन करणे आवश्यक आहे. या इंजेक्शनची कमतरता नाकारता येत नाही. परंतु कोरोना बाधित व्यक्तींसाठी केवळ हाच एक उपचार आहेहा गैरसमज आरोग्य विभागाने दूर करावा असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

 

मालेगाव समवेत भोकर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले जाईल. या ठिकाणी प्रत्येकी 30 बेडची सुविधा उपलब्ध आहे.सोमवारपासून सुरु होणाऱ्या मालेगाव येथील कोविड केअर सेंटरमधील 30 खाटांना ऑक्सिजनची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

 

ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध

ज्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. अशा कोरोना बाधितांना ऑक्सिजनची गरज भासते. जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण लक्षात घेता ऑक्सिजनसाठी वेळेवर धावपळ होवू नयेयाबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. आजच्या घडीला जिल्ह्यातील एकूण मागणी 28 ते 30 टनाची आहे. आपल्याकडे सद्यस्थितीत 39 टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. रोज मागणीप्रमाणे ऑक्सिजन पोहचत असून धास्तीचे कारण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिली.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 10 केएलचे दोन मोठे टँक कार्यरत असून या ठिकाणी आणखी 20 केएलचा मोठा टँक उभारला जात आहे. जिल्हा रुग्णालय येथे 13 केएल क्षमतेचा मोठा टँक आहे. सत्यकमल गॅसेस यांचा 20 केएलचा मोठा टँककलावती एअर प्रोडक्टचा 20 केएल क्षमतेचा एक मोठा टँक असे एकूण 93 केएल स्टोरेजची क्षमता आहे. या व्यतिरिक्त एअर सेप्रेशनचा तीन टनगुरु गॅस पाच टनअनुसुया (कृष्णूर) चा पाच टन अशी 13 टन रोज उत्पादन क्षमता असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहीत राठोड यांनी दिली.

 

0000

 

कृषि औजारे बँक योजनेचा

लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- जिल्हयातील बिलोली, लोहा, धर्माबाद, भोकर, मुदखेड तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमातर्गंत कृषि औजारे बँक ही योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. प्रति तालुका दोन औजारे बँक इतके लक्षांक या कार्यालयास प्राप्त झाले आहे. तरी जास्तीत जास्त महिला शेतकरी बचतगटांनी कृषि औजारे बँक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव  यांनी केले आहे.

 

मानव विकास कार्यक्रम सन 2020-21 अंतर्गत निवडलेल्या तालुक्यात  प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.  या योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, बिलोली, लोहा, धर्माबाद, भोकर, मुदखेड कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला बचतगटांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयामध्ये 30 एप्रिल 2021 पर्यंत दाखल करावेत. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहुन लाभार्थी निवड करण्यात येईल.  मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या बचतगटांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

1 हजार 234 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 351 व्यक्ती कोरोना बाधित

 25 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 676 अहवालापैकी 1 हजार 351 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 613 तर अँटिजेन तपासणीद्वारे 738 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 65 हजार  150 एवढी झाली असून यातील 50 हजार 80 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13  हजार  607 रुग्ण उपचार घेत असून 226 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी             डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 14 ते 16 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 202 एवढी झाली आहे.   दिनांक 14 एप्रिल रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नांदेड तालुक्यातील मार्कड येथील 67 वर्षाचा पुरुष, नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील 45 वर्षाचा पुरुष, कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 65 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील शिवाजी  चौक येथील 62 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील खानापूर येथील 58 वर्षाचा पुरुष, देगलूर येथील बापुनगर येथील 65 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड येथील गायकवाड गल्ली  येथील 70 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुगणालय येथे हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील 60 वर्षाची महिला, दि. 15 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नांदेड तालुक्यातील रहाटी येथील 62 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 65 वर्षाची महिला, भोकर  नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील मुदखेड तालुक्यतील मेंढका येथील 52 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील जवळा येथील 75 वर्षाचा पुरुष, वाघी रोड नांदेड येथील 40 वर्षाची महिला, लक्ष्मी नगर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे विजय नगर नांदेड येथील 37 वर्षाची महिला, नवीन कौठा नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, हिमायतनगर येथील 65 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील हिवरगा येथील 56 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील वारुळा 76 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे कामठा नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष , ऑयकॉन कोविड रुग्णालय येथे नायगाव येथील 62 वर्षाचा पुरुष, 16 एप्रिल 2021 रोजी जिल्हा रुगणालय कोविड हॉस्पिटल येथे सिडको नांदेड येथील 50 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.86 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात  275, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 2,  देगलूर 1, धर्माबाद 82, हदगाव 22, हिमायतनगर 1, कंधार 66, किनवट 1, लोहा 41,  मुखेड 39, मुदखेड 8, नायगाव 8, उमरी 25, परभणी 10, हिंगोली 3, लातूर 1, यवतमाळ 1, भोकर 4,  असे  एकूण 613 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 137, नांदेड ग्रामीण 47, अर्धापूर 26, भोकर 47, बिलोली 48, देगलूर 10, धर्माबाद 19, हदगाव 30, कंधार 30, किनवट 93, लोहा 24, माहूर 13, मुखेड 62, नायगाव 36, उमरी 22, परभणी 4, यवतमाळ 1, मुदखेड 85 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 738 बाधित आढळले.

 

आज 1 हजार 234 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 20, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 769, कंधार तालुक्याअंतर्गत

7, किनवट कोविड रुग्णालय 35, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 26, माहूर तालुक्यातंर्गत 6, देगलूर कोविड रुग्णालय 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21, मुखेड कोविड रुग्णालय 73, नायगाव तालुक्यातंर्गत 11, बारड कोविड केअर सेंटर 4, अर्धापूर तालुक्यातंर्गत 12, बिलोली तालुक्यातंर्ग 20, खाजगी रुग्णालय 103, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 26, धर्माबाद तालुक्यातंर्गत 13, उमरी तालुक्यातंर्गत 24, लोहा तालुक्यातंर्गत 46 यांचा समावेश आहे.

 

 

जिल्ह्यात 13 हजार 607 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 250, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 112, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 225, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 155, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 125, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 203, देगलूर कोविड रुग्णालय 58, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 88, बिलोली कोविड केअर सेंटर 158, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 23, नायगाव कोविड केअर सेंटर 69, उमरी कोविड केअर सेंटर 93, माहूर कोविड केअर सेंटर 70, भोकर कोविड केअर सेंटर 25, हदगाव कोविड रुग्णालय 51, हदगाव कोविड केअर सेंटर 105, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 137, कंधार कोविड केअर सेंटर 26, धर्माबाद कोविड केअर सेंटर 104, मुदखेड कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 28, मांडवी कोविड केअर सेंटर 7, महसूल कोविड केअर सेंटर 154, एनआरआय कोविड केअर सेंटर 112, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 151, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 630, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 3 हजार 788, खाजगी रुग्णालय 1 हजार 632, अर्धापूर कोविड केअर सेटर 15 असे एकूण 13 हजार 607 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 12 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 1 हजार 476

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 28 हजार 574

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 65 हजार 150

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 50 हजार 80

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 202

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.86 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-37

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-387

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13 हजार 607

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-226.

00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...