Wednesday, June 20, 2018


शासकीय वसतीगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 20 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील वसतिगृहातील 575 रिक्त जागांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर प्रथम वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षातील शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑफलाईन अर्ज संबधीत शासकीय वसतिगृहातील गृहपाल यांचेकडे सादर करावीत. अधिक माहितीसाठी संबंधीत वसतिगृहातील गुहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी 15 जून ते 4 जुलै 2018 पर्यंत, इयत्ता 11 वी व दहावीनंतरच्या अभ्यासक्रमात (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट पर्यंत, बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए., एम.कॉम, एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 15 जुलै ते 28 ऑगस्ट पर्यंत संबंधीत शासकीय वसतिगृहातील गृहपालांकडे अर्ज सादर करावेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्ह्यात मुलांसाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदेड, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नांदेड, अर्धापूर, हदगाव, भोकर, उमरी, नायगाव, बिलोली व धर्माबाद तसेच मुलींसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह विद्युतनगर व गांधीनगर नांदेड, हदगाव, भोकर, उमरी, देगलुर व मुखेड असे 16 वसतिगृह कार्यरत आहेत.
प्रवेश हे गुणवत्ता व आरक्षणावर आधारित असून पहिल्या व दुसऱ्या निवड यादी नंतर वसतिगृहात रिक्त जागा राहत असतील तर दुसऱ्या निवड यादीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देवुन झाल्यानंतर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्याने त्याच दिवशी वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. रिक्त जागेची वसतिगृह व प्रवर्गनिहाय माहिती संबधीत वसतिगृहात तसेच समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात येईल. वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


शासकिय तंत्र प्रशाला केंद्रात प्रवेश सुरु
नांदेड दि. 20 :- शासकीय तंत्र प्रशाला केंद्र देगलूर या संस्थेत शैक्षणिक सत्र 2018-19 साठी एचएससी व्होकेशनल इयत्ता 11 वीसाठी आयटीआय समकक्ष व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेश देणे चालू आहेत. ॲटोमोबाईल, इलेक्ट्रीकल व कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमता प्रत्येकी 30 असून कालावधी दोन वर्षांचा आहे. दहावी व पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय केंद्र, रामपूर रोड देगलूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.
000000


उद्योगाची आधार नोंदणी करण्याचे
 जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन
नांदेड दि. 20 :- जिल्ह्यातील उद्योजकांचे उद्योग सुरु आहेत अशा सेवा व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांनी www.udyogaadhar.gov.in या संकेतस्थळावर उद्योग आधार नोंदणी करुन एमएसएसई डेटा बँकची नोंदणी ऑनलाईन करावी. शासनाकडे उद्योगाची नोंद होऊन उद्योग क्षेत्रातील सवलती व योजनांचा लाभ घेण्यास उद्योग पात्र राहतील. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून मोफत नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांनी केले आहे.
पुढील उद्योग घटकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. सेवा उद्योगात ब्युटी पार्लर, गॅरेज, केश कर्तनालय, नेट कॅफे, प्रशिक्षण संस्था, पिठाची गिरणी, लाँड्री, रिपेअरींग सेंट सर्व प्रकारचे, मोबाईल दुरुस्ती, कॉम्प्युटर जॉबवर्क, वर्कशॉप, झेरॉक्स सेंटर आदी. उत्पादक व्यवसाय क्षेत्रात अन्य प्रक्रिया उद्योग, दालमिल, राईसमिल, मसाला उद्योग, चर्मोद्योग, रेडीमेड गारमेंटस, फॅब्रीकेशन वर्क्स, लोणचे पापड, द्रोण पत्रावळी, डेअरी प्रॉडक्टस, मिठाई तयार करणे, ऑईल मिल, कुक्कुट खाद्य, मका प्रक्रिया आदी व्यवसाय क्षेत्रातील घटकांनी नोंदणी करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


बारावी परीक्षेचे अर्ज
करण्यास मुदतवाढ      
नांदेड दि. 20 :- इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज नियमित शुल्क व विलंब शुल्कासह भरण्याच्या तारखा 4 ते 18 जून या कालावधीत निश्चित केल्या होत्या. मंडळाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊ अर्ज विलंब शुल्काने भरण्याची मुदत सोमवार 25 जून 2018 पर्यंत वाढविली आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षचे ऑनलाईन अर्ज   www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन घेण्यात येत आहेत. यासंदर्भात अडचणी असल्यास संबंधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्यमंडळ पुणे यांनी केले आहे.
शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची बारावी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये आयोजित केली आहे. दिनांक 14 ते 25 जून या कालावधीत भरलेली अर्ज विलंब शुल्कानुसार जमा करावीत. मात्र त्यानंतर अर्ज विलंब शुल्काने भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


दहावी-बारावीची
पुरवणी परीक्षा 17 जुलैपासून    
नांदेड दि. 20 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने दहावी व बारावीची लेखी पुरवणी परीक्षा 17 जुलै 2018 पासून तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 9 ते 16 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, असे राज्य मंडळ पुणे यांनी प्रकटनाद्वारे कळविले आहे.
जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा मंगळवार 17 जुलै ते गुरुवार 2 ऑगस्ट 2018, बारावी सर्वसाधारण विषयाची लेखी परीक्षा मंगळवार 17 जुलै ते शनिवार 4 ऑगस्ट 2018, बारावी व्यवसाय अभ्यासक्रम (नवीन) लेखी परीक्षा मंगळवार 17 जुलै ते गुरुवार 2 ऑगस्ट 2018 या कालावधीत होणार आहे.
या कालावधीत आयोजित केलेले दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रक माहितीसाठी असून परीक्षेपुर्वी शाळा, महाविद्यालयाकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम राहील. त्यानुसार वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य खाजगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन राज्यमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
000000


कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री
संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा    
नांदेड दि. 20 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 21 जून 2018 रोजी लातूर येथुन सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.50 वा. नांदेड विमानतळ नांदेड येथुन Trujet एअरवेज एअरलाईन्सच्या 2T493 या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वा. मुंबई येथून एअरवेज एअरलाईन्सच्या विमानाने नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...