बारावी परीक्षेचे अर्ज
करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 20 :- इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज नियमित शुल्क व विलंब शुल्कासह
भरण्याच्या तारखा 4 ते 18 जून या कालावधीत निश्चित केल्या होत्या. मंडळाने विद्यार्थ्यांचे
हित लक्षात घेऊ अर्ज विलंब शुल्काने भरण्याची मुदत सोमवार 25 जून 2018 पर्यंत
वाढविली आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षचे
ऑनलाईन अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावरुन घेण्यात येत आहेत. यासंदर्भात अडचणी असल्यास
संबंधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्यमंडळ पुणे यांनी केले आहे.
शिक्षण मंडळामार्फत
नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी
तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यांची बारावी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये आयोजित केली आहे. दिनांक 14
ते 25 जून या कालावधीत भरलेली अर्ज विलंब शुल्कानुसार जमा करावीत. मात्र त्यानंतर
अर्ज विलंब शुल्काने भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात
नमूद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment