उष्णतेच्या
लाटेपासून बचाव करण्यासाठी
नागरीकांनी
काळजी घ्यावी - जिल्हा प्रशासन
नांदेड दि. 4
:- उन्हाळयाची सुरुवात यावर्षी
लवकरच झाली असून मार्च ते जून या कालावधीत
राज्यात उष्णतेची तिव्रता निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानी व्यक्त
केली आहे. या उष्णतेच्या लाटेपासुन बचाव करण्यासाठी
नागरीकांनी व परिक्षांचा कालावधी पुढे सुरु होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य
ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उष्माघातामुळे शरीराचे तापमान वाढुन व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार करावे. उष्माघात होऊ नये यासाठी सोबत मोठा पांढरा पंचा आणि डोके झाकेल असा रुमाल, पूर्ण अंगभर शक्यतो सुती
कपडे परिधान करणे, कमीत कमी वेळात इच्छित
स्थळी पोहोचणे, जवळ पाण्याची बाटली बाळगणे, दर अर्ध्या तासाने दोन तीन ग्लास पाणी पिणे, अधून-मधून बर्फ न टाकलेले लिंबू
पाणी, फळांचे रस पिणे अशा उपायानी उष्माघात
टाळता येतो. उष्माघातावरील उपचार शरीराच्या तापमान वाढीच्या
कारणावर अवलंबून आहेत.
कडक उन्हामध्ये शरीराचे तापमान वाढल्याची शंका येताच स्वत:च्या रक्षणासाठी सावलीमध्ये
बसणे आणि भरपूर पाणी पिणे या उपायांनी पुरेसा आराम मिळतो. बाहेरील तापमान चाळीसहून अधिक आणि शरीराचे तापमान
चाळीस झाल्यास उष्माघात होतो. प्रखर तापमानात
बाहेर उन्हात फिरल्याने शरीरातील पाण्याची मात्रा अचानक कमी होते व मृत्यु ओढावतो. कानास फडके न बांधल्याने उष्णता
मेंदुपर्यंत जाते व व्यक्ती बेशुध्द होते, उपाशी पोटी उन्हात फिरल्याने शरीरास साखरेचा, ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो. अती थंड पाणी पिल्याने शरीराच्या
तापमानात अचानक बदल होतो. अश्यावेळी
त्वरीत वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. कारण नसताना उन्हात न जाणे, भरपुर पाणी
पिणे आणि सुती कपडे परिधान करने याद्वारे उष्माघात टाळता
येतो.
नागरीकांना उष्माघाताचा
रुग्ण आढळल्यास तात्काळ त्यास जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठवावे.
मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरुवात लवकर झालेली असुन उष्णतेच्या लाटेपासून
कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ न देण्यासाठी जिल्हयातील महानगरपालिका आणि
आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून उष्णतेच्या लाटेपासुन नागरीकांचे बचाव करावयाच्या तसेच
यंत्रणा सज्ज ठेवावयाच्या सूचना जिल्हा प्रशासनाव्दारे निर्गमित करण्यात आल्या
आहेत. उष्णतेची तिव्रता आणि तापमानात अचानक होणा-या वाढीवर नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी सावधगिरी
बाळगावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
000000