Friday, July 22, 2022

 आयटीआय येथे 22 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध,

विविध ट्रेडसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु


नांदेड (जिमाका) दि. 22 :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने आयटीआय प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी विविध ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. प्रवेश अर्ज भरुन फॉर्म निश्चिती करणेप्रवेश फॉर्म त्रुटी सुधारणेप्रवेश फिस भरणे या बाबी प्रवेश प्रक्रियेत आहेत. आयटीआय येथे 22 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी https//.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावाअसे आवाहन प्राचार्य एम.एस.बिरादार यांनी केले आहे.


प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवारांने अर्जातील माहिती दाव्यांचा पृष्ठयर्थ आवश्यक मुळ दस्तावेजकागदपत्रेकागदांच्या छायांकित प्रतीचा एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार दाखल करावेत. उमेदवारांनी व पालकांनी ऑनलाईन देण्यात आलेली माहितीप्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करुनच प्रवेश अर्ज सादर करावेत. फिटर/पेंटर जनरल/बेसिक कॉस्मॅटोलॉजी/सुईंग टेक्नॉलॉजी/शिट मेटल/टुल अॅड डायमेकर/टर्नर/वेल्डर/वायरमन/फॉड्रीमॅन/मशिनीस्ट/ट्रॅक्टर मेकॅनिक/ईलेक्ट्रशीयन/ड्राफ्सटमन सिव्हिल इ. ट्रेड आहेत. प्राचार्य एम.एस.बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश समिती प्रमुख सुभाष परघणेउपप्रमुख रविंद्र वानखेडेकेदार गिरीशसंजीवनी जाधवमांजरमकरगरूडकरप्रकाश बानाटे हे काम पाहत आहेत असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 
00000

 रस्ता सुरक्षा मार्गदर्शनाबाबत बैठक संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 22 : प्रादेशिक परिवहन कार्यालय व गट शिक्षणाधिकारी भोकर यांचे संयुक्त विद्यमाने भोकर तालुक्यातील सर्व माध्यमिक व प्राथमीक शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.

या बैठकीमध्ये शालेय परिवहन समितीस्कुल बस नियमावली व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त रस्ता सुरक्षाबाबत सहा. मोटार वाहन निरीक्षक प्रविण रहाणे यांनी मार्गदर्शन केले.  बैठकीस भोकर तालुक्याती 90 शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.  उपविभागीय अधिकारी राजेंद्र कंधारे, तहसीलदार राजेश लांडगेगट विकास अधिकारी अमित राठोड,  गट शिक्षणाधिकारी वाघमारे यांची उपस्थिती होती.

00000

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 143 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, कंधार 2, भोकर 1 व ॲटीजन तपासणीद्वारे कंधार 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 68 एवढी झाली असून यातील 1 लाख 327 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 49 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 13 असे एकूण 15 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 25, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, अश्विनी हॉस्पिटल 1 असे एकुण 49 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 11 हजार 598
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 91 हजार 165
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 68
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 327
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-49
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात शुक्रवार 22  जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 655.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 
जिल्ह्यात शुक्रवार 22 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 00 (632.20), बिलोली-0.60(692.60), मुखेड- 0.30 (608.50), कंधार-00.00 (640.40), लोहा-00.00 (596.20), हदगाव-1.40 (601.10), भोकर-1 (768.10), देगलूर-0.40 (579.50), किनवट-0.40 (666.90), मुदखेड- 0.30 (829), हिमायतनगर-16.80 (863.10), माहूर- 1 (553.20), धर्माबाद- 0.90(710.30), उमरी- 0.60(819.20), अर्धापूर- 0.20 (617), नायगाव-0.40 (603.90मिलीमीटर आहे.

0000

 नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसह

कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या

-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


 ·        1 लाख 47 हजार 67 शेतकऱ्यांच्या 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

·        उर्वरीत पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा शिवारात  

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळापैकी 80 महसूल मंडळातील चालू हंगामातल्या पिकांना क्षती पोहचलेली आहे. या 80 महसूल मंडळापैकी 61 महसूल मंडळात 2 वेळेस, 32 महसूल मंडळात 3 वेळेस, 12 महसूल मंडळात 4 वेळेस, 3 महसूल मंडळात 5 वेळेस, तर एका महसूल मंडळात 6 वेळेस अतिवृष्टी झाली आहे. याचबरोबर 9 जुलै रोजी 33 मंडळात, 10 जुलै रोजी 14 मंडळात, 13 जुलै रोजी 79 मंडळात, 14 जुलै रोजी 36 मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा सारासार विचार करता या पूर परिस्थितीमुळे सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांच्या 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात 1 हजार 429 हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून नुकसान झाले आहे. सदर शेती पिक व शेतजमीन नुकसानीचा तालुका निहाय तपशील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.  

 

नांदेड तालुक्यात 15 हजार 700 शेतकरी बाधित असून 9 हजार 630 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 91 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र, 3.17 हेक्टर फळपीक बाधित क्षेत्र असून 9 हजार 724.17 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे तर 110 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे.

 

अर्धापूर तालुक्यात 21 हजार 500 शेतकरी बाधित असून 10 हजार 81 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 1 हजार 70 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 11 हजार 151 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे तर 70 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे.

 

कंधार तालुक्यात 44 हजार 965 शेतकरी बाधित असून 24 हजार 100 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 15 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 24 हजार 115 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

लोहा तालुक्यात 41 हजार 200 शेतकरी बाधित असून 22 हजार 800 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 22 हजार 800 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

देगलूर तालुक्यात 32 हजार 400 शेतकरी बाधित असून 18 हजार 474 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 18 हजार 474 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

मुखेड तालुक्यात 21 हजार 300 शेतकरी बाधित असून 8 हजार 520 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 8 हजार 520 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

बिलोली तालुक्यात 32 हजार 114 शेतकरी बाधित असून 15 हजार 557 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 15 हजार 557 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

नायगाव तालुक्यात 46 हजार 788 शेतकरी बाधित असून 14 हजार 15 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत बाधित क्षेत्र 110 हेक्टर असून 14 हजार 125  हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

धर्माबाद तालुक्यात 20 हजार 748 शेतकरी बाधित, 12 हजार हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 12 हजार हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र असून शेत खरडून 160 हेक्टर आहे.

 

उमरी तालुक्यात 21 हजार 260 शेतकरी बाधित असून 9 हजार 540 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत क्षेत्र 1 हजार 530 हेक्टर असून 11 हजार 70 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

भोकर तालुक्यात 40 हजार 950 शेतकरी बाधित, 25 हजार 180 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 25 हजार 180 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

मुदखेड तालुक्यात 30 हजार 107 शेतकरी बाधित असून 6 हजार 973 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 6 हजार 973 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

 

हदगाव तालुक्यात 52 हजार 431 शेतकरी बाधित असून 16 हजार 415 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळबाग 28 हेक्टर क्षेत्र असून 26 हजार 443 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 63 हेक्टर आहे.

 

हिमायतनगर तालुक्यात 33 हजार 215 शेतकरी बाधित असून 26 हजार 402 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 26 हजार 402 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 166 हेक्टर आहे.

 

किनवट तालुक्यात 54 हजार 503 शेतकरी बाधित असून 48 हजार 832 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 48 हजार 832 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 720 हेक्टर आहे.

 

माहूर तालुक्यात 24 हजार 203 शेतकरी बाधित असून 16 हजार 63 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळपीक बाधित क्षेत्र 3 हेक्टर असून 16 हजार 66  हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 140 हेक्टर आहे.

 

जिल्ह्यातील एकुण बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 5 लाख 33 हजार 384 एवढी आहे. जिरायत बाधित क्षेत्र 2 लाख 94 हजार 582 हेक्टर एवढे आहे. बागायत बाधित क्षेत्र 2 हजार 816 हेक्टर आहे. फळपीक बाधित क्षेत्र 34.17 हेक्टर आहे. एकुण बाधित क्षेत्र हे 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर एवढे आहे. शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 1 हजार 429 हेक्टर एवढे आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत अतिवृष्टीची संभावणा लक्षात घेऊन मंडळ निहाय महसूल यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिलेले होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार व कृषि विभागाचे अधिकारी हे प्रत्येक मंडळ निहाय प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी करीत आहेत. सदर पिक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील 439 तलाठी, कृषि विभागातील 643 कृषि सहाय्यक व जिल्हा परिषद विभागातील 884 ग्रामसेवक ही टीम प्रत्यक्ष बांधावर जाऊन युद्धपातळीवर काम करीत आहेत. आज रोजी 1 लाख 47 हजार 67 एवढ्या शेतकऱ्यांचे 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरीत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

00000

अर्धापूर येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 22 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अर्धापुर तालुक्यातील महात्मा बसवेश्वर विद्यालय, मिनाक्षी देशमुख मेमोरियल माध्यमिक मुलीची शाळा व जिल्हा परिषद शाळा अर्धापूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट/सिटबेल्ट परिधान करणे व मुलांनी रस्त्यावर वावरतांना कसे वागावे याबाबत मार्गदर्शन सहा. मोटार वाहन निरीक्षक वैभव डुब्बेवार, स्वप्निल राजुरकर व निलेश ठाकुर यांनी केले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना शालेय परिवहन समिती व स्कुलबस नियमावली बाबत माहिती दिली.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...