Tuesday, December 22, 2020

 

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

बुधवार 23 डिसेंबर रोजी ऑनलाईन जाहीर होणार  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ऑनलाईन बुधवार 23 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून निकालाची कार्यपद्धती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे राहिल. 

राज्यात नऊ विभागीय मंडळामार्फत नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 वा. जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. 

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रामणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इयत्ता 10 वीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. 

गुणपडताळणीसाठी गुरुवार 24 डिसेंबर 2020 ते शनिवार 2 जानेवारी 2021 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 24 डिसेंबर 2020 ते मंगळवार 12 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबीट कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीआय, नेटबँकिंग याद्वारे भरता येईल. 

नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

सन 2021 मधील इयत्ता 10 व बारावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणारे व अन्य विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस सर्व विषय घेऊन प्रथमच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील. सन 2021 मधील परीक्षेसाठी फेब्रुवारी-मार्च 2020 अथवा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

60 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू  

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  मंगळवार 22 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 60 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 32 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 28 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 904 अहवालापैकी 838 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 149 एवढी झाली असून यातील 20 हजार 75 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 312 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार 22 डिसेंबर रोजी मुदखेड तालुक्यातील मेंडका येथील 85 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर सोमवार 21 डिसेंबर रोजी माहूर येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा किनवट कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 565 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.92 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 23, देगलूर तालुक्यात 1, कंधार 3, नांदेड ग्रामीण 1, मुखेड 3, नायगाव 1 असे एकुण 32 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 14, देगलूर तालुक्यात 3, माहूर 2, कंधार 1, यवतमाळ 1, भोकर 1, हदगाव 1, मुखेड 3, लोहा 1, हैदराबाद 1 असे एकुण 28 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 312 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 19, मुखेड कोविड रुग्णालय 16, देगलूर कोविड रुग्णालय 20, हदगाव कोविड रुग्णालय 9, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 153, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 29, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 24 आहेत.   

मंगळवार 22 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 72 हजार 442,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 47 हजार 216

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 149

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 75

एकुण मृत्यू संख्या-565

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.92 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-474

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-312

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.           

000000

 

अनुसूचित क्षेत्रातील वैयक्तिक व सामुहिक वनहक्क

दावेदारांना अपिल दाखल करण्याची सुवर्णसंधी

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यातील एकूण 125 ग्रामपंचायतींमधील 238 गावांना अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अनुसूचित क्षेत्रातील जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या वैयक्तिक वनहक्क व सामुहिक वनहक्क दावेदारांनी विभागीय वनहक्क समिती औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल करावे असे, आवाहन जिल्हास्तरीय वनहक्क समिती नांदेडचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

निर्देशित अनुसूचित क्षेत्रातील जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या अपिल दावेदारांना राज्यपाल महोदय यांची अधिसूचना 18 नोव्हेंबर 2020 व शासन निर्णय 10 डिसेंबर 2020 अन्वये जिल्हास्तरीय वनहक्क समितीने 18 मे 2020 पुर्वी अमान्य केलेल्या वनहक्क दाव्यावर 17 नोव्हेंबर 2020 पासून 6 महिन्याच्या आत तसेच 18 मे 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत अमान्य केलेल्या दावेदारांना 17 नोव्हेंबर 2020 पासून 90 दिवसांचे आत विभागीय वनहक्क समिती औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल करता येईल. याशिवाय वरील कालावधीव्यतिरिक्त जिल्हास्तरीय समितीने अमान्य केलेल्या दाव्याच्या दिनांकापासून 90 दिवसाचे आत विभागीय वनहक्क समितीकडे अपिल दाखल करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

000000

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...