Sunday, August 25, 2024


शिव महापुराण कथा आज ऑनलाईन ऐका !
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड येथे 23 ते 29 ऑगस्ट पर्यंत होणार असलेली पं. प्रदीपजी मिश्रा यांची श्री शिव महापुराण कथा नांदेड येथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस ही कथा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.तरी शिवभक्तांनी श्री. शिवमहापुराण कथास्थळी येऊ नये असे आवाहन मा. जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत आणि आयोजक श्री. शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांनी केले आहे.


 

वृत्त क्र. 767

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा 

नांदेड दि. 25  ऑगस्ट :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे हे सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजी लातूर येथून मोटारीने सकाळी 10.30 वा. श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड श्री. ष. ब्र. प्र. 108 डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे 17 वे श्रावणमास तपोनुष्ठाण समाप्ती सोहळ्यास उपस्थिती. स्थळ श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड. सकाळी 11.30  वा. जनसेवा प्राथमिक शाळा मुखेड येथे सदिच्छा भेट. स्थळ- महाजन पेट्रोल पंपाच्या शेजारी शिरुर रोड मुखेड. दुपारी 12.30 वा. नई आबादी जळकोट येथे श्री मदारसाब बक्सूसाब बागवान यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.

0000

#लखपतीदीदी योजनेच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय उभा केलेल्या कर्तृत्ववान लखपती दीदींचा सन्मान सोहळा उद्या २५ ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगाव येथे होत आहे.




























 

वृत्त क्र. 766

तख्त सचखंड श्री हुजूर  साहिब  गुरुद्वारात

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन

 

नांदेड, दि. 25 :- केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ  यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊतसचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदारसंत बाबा रामसिंघजी सहायक जथेदारअधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजीसहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूरजयमलसिंघ ढिलोरविंद्रसिंघ बुंगईराजेंद्रसिंघ पुजारीरेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकारउपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती.

0000








 वृत्त क्र. 765

नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ

• केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी
नांदेड दि. 25 ऑगस्ट :- नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या भुमीत त्यांनी सर्व जगाला मानवतेची शिकवण दिली आहे. अशा या पावनभूमीतील नांदेडचे रेल्वे स्टेशन हे येत्या कालावधीत सर्व सोयीनी सुविधांनी युक्त असलेले देशातील सर्वोत्तम रेल्वे स्टेशन करण्यात येईल,असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी केले.
गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यत पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन येथून दुपारी 12.30 वाजता या यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी या विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, संत बाबा कुलवंत सिंघजी, समुह पंच प्यारे साहिबान, संत बाबा बलविंदर सिंघजी, आयोजक रविंद्रसिंघ बुंगई, दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे आदींची उपस्थिती होती.
नांदेड रेल्वे स्टेशन येथून आज पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वेला रवाना करण्यात आले. या यात्रेत 1 हजार 300 भाविकांचा समावेश असून ही यात्रा पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगडसाहिब सरहंद, दमदमासाहिब भटींडा, दरबारसाहिब अमृतसर येथे पोहोचणार आहे. तसेच ही यात्रा 6 सप्टेंबर रोजी नांदेडला वापस पोहोचणार आहे. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी लंगर, वाहनांची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था केली आहे.
00000






















  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...