लोकन्यायालयाचे
शनिवारी जिल्ह्यात आयोजन
शेतकरी,
पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे
मिटवून
मावेजा मिळवावा
नांदेड,
दि. 9 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,
मुंबई यांच्या आदेशान्वये शनिवार 14 जुलै 2018 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील
सर्व तालुका न्यायालयात करण्यात आले आहे. संबंधित शेतकरी / पक्षकार यांनी प्रकरण जेथे
प्रलंबित आहे त्याठिकाणी उपस्थित राहून प्रकरण तडजोडीने मिटवून मंजूर मावेजा मिळवावा,
असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.
या राष्ट्रीय
लोक न्यायालयात भूसंपादन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली असुन न्यायालयात बऱ्याच वर्षांपासून
प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे ज्यात शासनाकडून निधी मंजुर झालेला आहे अशी प्रकरणे
संबंधितांनी उपस्थित राहिल्यास निकाली निघून मावेजा वेळेत प्राप्त होईल. उप कार्यकारी
अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 5,
6 व 8 यांचेकडून न्यायालयात प्रलंबित प्रकरणे ज्यात
शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे अशी प्रकरणांची यादी प्राप्त झाली आहे.
संबंधित
शेतकरी / पक्षकार यांना शनिवार 14 जुलै 2018 रोजी आपले प्रकरण
जेथे जिल्हा / तालुक्याच्या ठिकाणी प्रलंबित आहे त्याठिकाणी स्वतः वेळेत उपस्थित रहावे
आणि आपले प्रकरण तडजोडीने मिटवून मंजूर झालेला मावेजा मिळवावा, असेही आवाहन जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.
00000