Sunday, May 23, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 103 व्यक्ती कोरोना बाधित

7 जणाचा मागील तीन दिवसात मृत्यू

155 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 234 अहवालापैकी 103 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 57 तर अँटिजेन तपासणीद्वारे 46 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 999 एवढी झाली असून यातील 84 हजार 52 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 664 रुग्ण उपचार घेत असून 69 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 21 मे 2021 रोजी नारायणा कोविड रुग्णालयात शिवाजीनगर नांदेड येथील 76 वर्षाचा पुरुष, दि. 22 मे रोजी क्रिटिकल केअर कोविड रुग्णालयात भाग्यनगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उमरी येथील 65 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 55 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे माहूर तालुक्यातील असनी येथील 65 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील रातोळी येथील 60 वर्षाचा पुरुष तर दि. 23 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे वजिराबाद नांदेड येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 852 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 13, देगलूर तालुक्यात 5, किनवट 4, मुखेड 3, कोल्हापूर 1, नांदेड ग्रामीण 5, धर्माबाद 5, लोहा 7, नायगाव 2, अर्धापूर 1, हदगाव 3, माहूर 1, परभणी 1, बिलोली 1, हिमायतनगर 3, मुदखेड 1, हिंगोली 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 12, हदगाव तालुक्यात 4, माहूर 1 अर्धापूर 5, कंधार 2, मुदखेड 7, भोकर 1, किनवट 4, मुखेड 2, बिलोली 1, लोहा 1, नायगाव 4, उमरी 2 असे एकूण 103 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 155 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 12, हदगाव कोविड रुग्णालय 4, अर्धापूर तालुक्यांतर्गत 29, लोहा तालुक्यांतर्गत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 20,  मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 50, मांडवी कोविड केअर सेंटर 4, धर्माबाद कोविड केअर सेंटर 4, किनवट कोविड रुग्णालय 15 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 664 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 37, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 52, बारड कोविड केअर सेंटर 18, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 33, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 12, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15, भोकर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 11, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 11, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर 28, मुदखेड कोविड केअर सेंटर 22, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, बिलोली कोविड केअर सेंटर 18, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 2, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 115, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 890, खाजगी रुग्णालय 261 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 98, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 86, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 13 हजार 564

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 15 हजार 37

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 999

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 52

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 852

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.51 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-50

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-224

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 664

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-69

00000

 

जिल्ह्यातील 89 केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 89 लसीकरण केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 24 मे रोजी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 8 केंद्रांवर कोविशील्ड या लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  कौठा व सिडको या 5 केंद्रांवर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय येथे कोविशील्डचे 80 डोस, शहरी दवाखाना जंगमवाडी येथे कोविशील्डचे 30 डोस व शहरी दवाखाना शिवाजीनगर येथे कोविशील्डचे 20 डोस दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण रुग्णालय बारड येथे कोविशील्डचे 90 डोस, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे कोविशील्डचे 30 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सीनचे 20 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 22 मे पर्यंत एकुण 4 लाख 15 हजार 616 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 23 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 5 हजार 340 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 40 हजार 270 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

ऑटोरिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदानासाठी

ऑनलाईन अर्जाद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहन   

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ऑटोरिक्षा परवानाधारकांच्याच बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी आपली ऑनलाइन माहिती स्वत:च्या मोबाईलवरुन किंवा सीएससी सेंटरवर जाऊन नोंदवावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही दलालाची नेमणूक केली नाही. परवानाधारकांनी अनाधिकृत व्यक्तीशी संपर्क करु नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

शासनाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना आर्थिक मदत देण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme ही प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीत रिक्षा परवानाधारकाला स्वत:चे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमांक आदी माहितीची नोंद करावी लागणार आहे. नोंद केलेली माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खात्री करून घेतली जाणार आहे. त्यानंतर सदर अर्ज हा अनुदान खात्यात जमा होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

 

परवानाधारक रिक्षा चालकाला अर्ज करतांना अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  mh26@mahatranscom.in या ईमेल आयडीवर किंवा कार्यालयाच्या 02462-259900 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे स्वत: येऊन संपर्क साधावा.

00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...