Tuesday, February 14, 2017

उद्योग विभागाच्या जिल्हा पुरस्काराचे शुक्रवारी वितरण  
नांदेड दि. 14 :- लघु उद्योजकांसाठीच्या जिल्हा पुरस्काराचे वितरण शुक्रवार 17 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 2 वा. उद्योग भवन सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे होणार आहे. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.  या कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक गौतम लाडे यांनी केले आहे.
उद्योग संचालनालयाच्या जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत सन 2016 या वर्षाचा जिल्हा पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार लिंबगाव येथील मे. के. के. हर्बल इंडस्ट्रीजचे डॉ. के. आर. कदम यांना तर द्वितीय पुरस्कार देगलूर येथील मे. अनंत ॲग्रो इंडस्ट्रीजचे भागीदार विठ्ठल नरहरी पोलावर यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील या लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास उपविभागीय कार्यालय नांदेडचे प्रभारी अधिक्षकीय उद्योग अधिकारी संदीप रोकडे यांची  उपस्थिती राहणार आहे.   

000000
जि.प., पं.स. निवडणूक मतदानासाठी
हिमायतनगरमधील बुधवारचा बाजार बंद 
नांदेड, दि. 14  :- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवार 15 फेब्रुवारी हिमायतनगर येथे भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यास आणि तो अन्य दिवशी शुक्रवारी 17 फेब्रुवारी 2017 रोजी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन काढले आहे.  
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था पळसपूर रोड हिमायतनगर येथे मतदान साहित्य वितरण व्यवस्थेस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी भरणारा आठवडी बाजार बंद करुन तो शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी भरवण्यात येणार आहे.

000000
जिल्ह्यात 19 फेब्रुवारी रोजी दारु विक्री बंद
नांदेड दि. 14 :-  जिल्ह्यात रविवार 19 फेब्रुवारी 2017 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी रविवार 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहे.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी शिवजयंती रविवार 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

000000
जि.प., पं.स. मतदान, मतमोजणीमुळे
जिल्ह्यात दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मतदानाच्या अगोदरचा दिवस बुधवार 15 फेब्रुवारी पूर्ण दिवस, मतदानाच्या दिवशी गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत व मतमोजणीचा दिवस गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होत असलेल्या मुख्यालयी ठिकाणी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.   
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भयपणे व शांततेत पार पडावे तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनूचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंद वह्या इत्यादी ) नियम 1969 मधील नियम 9 (अ) मधील उपनियम (2) मधील खंड (सी) उपखंड-(2) अन्वये तसेच महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 च्या नियम 26 चा उपनियम (1) मधील खंड सी (1) अन्वये व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम 1968 च्या नियम 5 अ अन्वये मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल/बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या अंतर्गत मद्यविक्रीस पूर्ण पणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

000000
जि.प , पं. स. निवडणुकीसाठी
आचारसंहिता कक्ष आणखी सतर्क
नांदेड दि. 14 :-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा कालावधी मंगळवार 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आचारसंहिता कक्षांना अधिक सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. आचारसंहिता भंगाबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी त्या-त्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षांशी किंवा जिल्हास्तरावरील आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जि.प. व पं. स. निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निर्देशीत केल्यानुसार निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार कालावधी मंगळवार 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन होईल तसेच या कालावधीतील प्रचार व मतदारांना प्रभावीत करण्याच्या गैर प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी चांगला समन्वय ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. आचारसंहिता भंगाविषयी तक्रारी, सूचना इत्यादीसाठी संबंधितांना तालुकास्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तसेच संबंधीत मतदारसंघातील तहसिल कार्यालयांकडील आचारसंहिता कक्षांशी संपर्क साधता येईल. या तहसिल कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे. माहूर 02460-268521, किनवट 02469- 222228, हिमायतनगर 02468-244428, हदगाव 02468- 222328, अर्धापूर 02462- 272167, नांदेड 02462-236769 , मुदखेड 02462- 223884, भोकर 02467- 222622, उमरी 02467- 244202, धर्माबाद 02465- 244279, बिलोली 02465 – 223123, नायगाव खै 02465- 203592, लोहा 02466- 242460, कंधार 02466 – 223424, मुखेड- 02461- 222522, देगलूर  02463- 255033. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 02462 – 235077  यांच्याशी संपर्क साधता येईल, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...