Tuesday, February 14, 2017

जि.प , पं. स. निवडणुकीसाठी
आचारसंहिता कक्ष आणखी सतर्क
नांदेड दि. 14 :-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा कालावधी मंगळवार 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आचारसंहिता कक्षांना अधिक सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. आचारसंहिता भंगाबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी त्या-त्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षांशी किंवा जिल्हास्तरावरील आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जि.प. व पं. स. निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निर्देशीत केल्यानुसार निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार कालावधी मंगळवार 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन होईल तसेच या कालावधीतील प्रचार व मतदारांना प्रभावीत करण्याच्या गैर प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी चांगला समन्वय ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. आचारसंहिता भंगाविषयी तक्रारी, सूचना इत्यादीसाठी संबंधितांना तालुकास्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तसेच संबंधीत मतदारसंघातील तहसिल कार्यालयांकडील आचारसंहिता कक्षांशी संपर्क साधता येईल. या तहसिल कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे. माहूर 02460-268521, किनवट 02469- 222228, हिमायतनगर 02468-244428, हदगाव 02468- 222328, अर्धापूर 02462- 272167, नांदेड 02462-236769 , मुदखेड 02462- 223884, भोकर 02467- 222622, उमरी 02467- 244202, धर्माबाद 02465- 244279, बिलोली 02465 – 223123, नायगाव खै 02465- 203592, लोहा 02466- 242460, कंधार 02466 – 223424, मुखेड- 02461- 222522, देगलूर  02463- 255033. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 02462 – 235077  यांच्याशी संपर्क साधता येईल, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...