Monday, October 30, 2023

31 ऑक्टोंबर राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्याच्या सूचना

 31 ऑक्टोंबर राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्याच्या सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 31 ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळण्यात यावा असे निर्देश शासनाने दिले आहेत.   


जिल्ह्यात राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त मेळावे आयोजित करावे. या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय गीत, देशभक्तीपर गीते, भाषणे, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या भाषणातील उतारे वाचने, तसेच सर्व धर्मीय लोकांचा, सर्व राजकीय पक्षांचा आणि युवक नेत्यांचा सहभाग असावा असे पत्रात नमूद केले आहे.

0000

 

राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचे निर्देश

 राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचे निर्देश

नांदेड, (जिमाका) दि. 30 :-  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिना निमित्त 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात यादिवशी विविध उपक्रमाचे आयोजन करुन राष्ट्रीय एकता दिन साजरा करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-2023 परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :-  नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं.18 आणि 22 नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, लातूर रोड, नांदेड,  राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युत नगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 1, 2 व 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत  तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 5 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

 प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी

शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती साठी माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावेअसे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 3 नोव्हेंबर, 4 डिसेंबर या दिवशी आहे. धर्माबाद येथे 6 नोंव्हेबर, 6 डिसेंबर या दिवशी आहे. किनवट  9 नोव्हेंबर, 8 डिसेंबर या दिवशी आहे. मुदखेड येथे 15 नोव्हेंबर, 15 डिसेंबर यादिवशी आहे. माहूर येथे 17 नोव्हेंबर,  18 डिसेंबर या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे. हदगांव येथे 20 नोव्हेबर, 20 डिसेंबर यादिवशी आहे. धर्माबाद येथे 24 नोव्हेंबर, 22 डिसेंबर या दिवशी आहे. हिमायतनगर येथे 28 नोव्हेबर, 27 डिसेंबर या दिवशी आहे. किनवट येथे 30 नोव्हेंबर व 29 डिसेंबर या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती साठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

राष्ट्रीय एकता दिना निमित्त मंगळवारी एकता दौडीत सहभागी होण्याचे आवाहन

                                                        राष्ट्रीय एकता दिना निमित्त मंगळवारी

एकता दौडीत सहभागी होण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त 31 ऑक्टोंबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मंगळवार 31 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता राष्ट्रीय एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरवात महात्मा गांधी यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन  महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

000000

एमएसएमई क्षेत्र व शासनाची धोरणे व उपक्रम याबाबत 1 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

 एमएसएमई क्षेत्र व शासनाची धोरणे  उपक्र

याबाबत 1 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरणनिर्यातएक जिल्हा एक उत्पादन व एमएसएमई क्षेत्राबाबत उद्योजकांना माहिती व्हावी. तसेच राज्य व केंद्र सरकारची धोरणे व उपक्रमाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रमार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार 1 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखाली हॉटेल चंद्रलोक, महाराणा प्रताप चौक, नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेसाठी जिल्हयातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजकउद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग  संस्था यांनी उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या  कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्हयातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा आहे. तसेच स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजनापॅकिंग  ब्रॅडींगआवश्यक चाचण्या इ. विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.

 

या कार्यशाळेचे सीडीबी, आयडीबीआय, कॅपिटल हे मुख्य प्रायोजक आहेत. याशिवाय उद्योग संचालनालय, मुंबई अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र नांदेड व इतर निगडीत विभागाचे संबंधित अधिकारी, तज्ञ मान्यवर कार्यशाळेत उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.  या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील औद्योगिक संघटनानिर्यातदारनामांकित उद्योजकउद्योजक व्यवसायाशी  संबंधीत सर्व शासकीय विभाग, महिला स्वयं सहाय्यता बचत गटाचे सदस्य निर्यातीशी संबंधीत अधिकारी व केंद्र व राज्य शासनाचा अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...