124 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी
101 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 25 :- रविवार 25 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 124 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 101 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 45 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 56 बाधित आले.
आजच्या एकुण 1 हजार 129 अहवालापैकी 999 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 753 एवढी झाली असून यातील 17 हजार 219 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 905 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवार 24 ऑक्टोंबर रोजी लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 500 झाली आहे.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 8, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 1, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, माहूर कोविड केंअर सेंटर 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 2, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 65, खाजगी रुग्णालय 30 असे 124 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 36, अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद 1, जालना 1, नांदेड ग्रामीण 2, लोहा 1, हिंगोली 2, यवतमाळ 1 असे एकुण 45 बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 28, भोकर तालुक्यात 2, लोहा 4, माहूर 1, मुखेड 1, नायगाव 1, निजामाबाद 1, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 1, किनवट 13, हदगाव 1, कंधार 1, सोलापूर 1 असे एकूण 56 बाधित आढळले.
जिल्ह्यात 905 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 161, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 381, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड
येथे 45, जिल्हा
रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 22, हदगाव कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 10, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 13, मांडवी कोविड केअर सेंटर 14, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, मुदखेड कोविड केअर सेटर 5, माहूर कोविड केअर सेंटर 17, किनवट कोविड केअर सेंटर येथे 31, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, उमरी कोविड केअर सेंटर 7, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 14, भोकर कोविड केअर सेंटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी
रुग्णालयात दाखल 121, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद
येथे संदर्भीत 1 झाले आहेत.
रविवार 25 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 68, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 76 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना
संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1
लाख 6 हजार 117
निगेटिव्ह स्वॅब- 83 हजार 979
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 753
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 219
एकूण मृत्यू संख्या- 500
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 478
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 905
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 33.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात
कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या
मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड
करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप
सतर्क करेल, असे
आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
0000