डिजीटल
प्रदानांतर्गत ‘डिजीधन’ मेळावा
6 ऐवजी 24 मार्च रोजी होणार
नियोजन भवन येथे
आयोजन
नांदेड दि. 28 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमे
अंतर्गत राज्यभरात डिजीधन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात अशा
या डिजीधन मेळाव्याचे सोमवार 6 मार्च 2017 रोजी आयोजन करण्यात येणार होते.
तथापी निती आयोगाच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार हा मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017
रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे , जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले
आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण
नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजन भवन मध्ये
मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच
विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.
रोकडरहित व्यवहारांना
प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित
या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही
सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात
बँका व इतर सहभागी घटक विविध दालनांद्वारे डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची
प्रात्यक्षिके, माहिती देणार आहेत.
0000000