Wednesday, March 26, 2025

 वृत्त क्रमांक 332

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे

सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा दौरा

नांदेड दि. 26 मार्च  :- महाराष्ट्र  राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

बुधवार 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी हिंगोली येथून सोयीनुसार वाहनाने नांदेडकडे रवाना व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. गुरुवार 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यत मुख्याधिकारी अर्धापूर नगरपरिषद यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 12 ते 1 पर्यत मुख्याधिकारी भोकर नगरपरिषद यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 1 ते 2 पर्यत मुख्याधिकारी मुखेड नगरपालिका यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 2 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते 4 पर्यत मा. आयुक्त नांदेड महानगरपालिका यांचेसोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 4 ते सायं. 5 वाजेपर्यत मुख्याधिकारी पूर्णा नगरपरिषद यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी व नंतर सोयीनुसार नांदेड येथून कारने पुणेकडे रवाना. 

00000

 वृत्त क्रमांक 331

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेतील लाभार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड 

नांदेड दि. 26 मार्च  :-अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबत योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली आहे. 

या योजनेसाठी पात्र बचतगटांनी सन 2023-24 साठी http://mini.mahasamajkalyan.in/  या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या बचतगटांची संख्या उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यामुळे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने उद्या 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथील सभागृहामध्ये करण्यात येणार आहे. तरी लॉटरी पध्दतीने निवड करण्यासाठी पात्र अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 330

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा 

                                                                                                                                                                         नांदेड, दि. 26 मार्च :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

                                                                                                                                                                            बुधवार 2 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता कळमनुरी येथून विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वा. लोहा ता. जि. नांदेड येथे तहसिलदार लोहा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. दुपारी 1 वा. कंधार ता. जि. नांदेड येथे तहसिलदार कंधार यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. दुपारी 2 वाजता विश्राम भवन, कंधार जि. नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. जळकोटकडे रवाना.  

00000

  वृत्त क्रमांक 329

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात 

जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक

6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर

नांदेड दि. 26 मार्च  :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई - ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. २०२४-२५ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते. वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली. या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्य कर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक जाहिर झाले आहे. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या तालुकास्तरावर देखील त्यांनी ई -ऑफिस प्रणाली सुरू केली होती. त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली. नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे.

संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात ई-ऑफिस प्रणाली राबविण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना 6 लक्ष रुपयांचे द्वितीय राज्यस्तरीय पारितोषिक शासनाच्यावतीने जाहीर झाले आहे. महसूली विभागातील बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकरणामुळे प्रशासनाच्यामध्ये मोठया प्रमाणात बदल करणे आवश्यक असते. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशिलता आणण्यासाठी तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान व स्पर्धा आयोजित केली जाते. 

या गटात अवैध गौन खनिज उत्पादन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता केलेल्या प्रयोगासाठी अहिल्यानगरला प्रथम पुरस्कार. तर नगर परिषद कार्यालयाकरिता सोलार प्रकल्प कार्यान्वित केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

0000



वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...