Wednesday, May 25, 2022

 प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 36 ई-बाइक्सची तपासणी  

 

·  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम  

 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय वायुवेग पथकाने नांदेड शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या 36 ई-बाईक्सची तपासणी 23 व 24 मे रोजी केली. यावेळी वाहने दोषी आढळून आले असून त्यापैकी 4 वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

 

वाहन उत्पादक, वितरक आणि नागरिकांनी ई-बाईक्स वाहनात अनधिकृत बदल करू नये. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम 26 व 27 मे 2022 रोजी राबविण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित वाहन उत्पादकवाहन वितरक व वाहन धारकाविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करता येईल. तसेच ज्या वाहन वितरकांनी ई-बाईक्सच्या विक्रीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडकडून व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त केले नाही त्यांनी लवकरात-लवकर व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत बैठक संपन्न

 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :-  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय समन्वयक समितीची बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी बैठकीचा आढावा घेवून संबंधित विभागाला सूचना दिल्या.

 

याबाबत जिल्हातील सर्व शाळाकॉलेज शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात जनजागृती करावी. तसेच नागरिकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करावे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे व विक्री करण्यावर बंदी आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला आरोग्यपोलिस विभागातील तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामीण डेंटल कॉलेजच्यावतीने नांदेड शहराच्या विविध ठिकाणी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती देऊन जगजागृती करण्यात येणार आहे.

0000

 एकल वापर प्लास्टीक वापरावर 1 जुलै पासून बंदी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

·         जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सची बैठक

 

नांदेड, (जिमाका) दि. 25 : एकल वापर प्लास्टिकच्या वापरातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यात विशेषत: सजावटीसाठी  वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकॉल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक काड्याच्या कानकोरणी, प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅन्डी, आईस्क्रीम कांड्या, प्लास्टिक प्लेटस, कप ग्लासेस व इतर साहित्यांचा समावेश आहे. या सर्व वस्तुंवर 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात आली असून याची विक्री होत असल्याचे निर्देशनास आल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.  

जिल्हाधिकारी कार्यालयात आज एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुकाबले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा नियोजन अधिकारी विकास आडे, मनपाचे उपायुक्त निलेश सुकेवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णीकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, क्षेत्रिय अधिकारी पंकज बावणे, महेश चावला तसेच गटविकास अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तू ऐवजी निसर्ग पुरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बाबु, लाकडी वस्तु, सिरामिक्सचे प्लेट, वाट्या आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपुरक वस्तुंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन डॉ. विपीन यांनी केले.   

महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार 500 पाचशे रूपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रूपये पर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास 10 हजार रूपये दंड आकारला जाईल. तिसऱ्यांदा कोणी धाडस केले तर त्यांच्याविरुद्ध 25 हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असेल. प्लास्टिकच्या वस्तू पासुन पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होवू नये यादुष्टिने यावर पूर्नप्रक्रिया करण्यावर अधिक भर द्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांनी यावेळी स्पष्ट केले.   

000000 





 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'माहिती भवनइमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार

'माहिती भवनप्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल

-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबईदि. 24 : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवनप्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेलअसा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

            नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.  सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरेमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेदैनिक सामनाचा मी देखील काही काळ संपादक होतोत्यामुळे राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत मी मोठा झालोत्यामुळे पत्रकारितेशी माझे कायम ऋणानुबंध आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये बराच बदल झाला असून खिळ्यांच्या ब्लॉकच्या टाईपसेटिंगपासून मोबाईलपर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास थक्क करणारा आहे. आता एका क्षणात जगभरात माहिती पाठवता येते आणि हे काम करण्यासाठी पत्रकारांना एका ठिकाणी बसता यावे याकरिता माहितीभवन निश्चितच उपयुक्त ठरेल. चुकीच्या माहितीवर आधारित अनेक बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध होत असतातत्या बातम्यांची वस्तुस्थिती वेळोवेळी जनतेसमोर मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे खुलासे होणे आवश्यक आहे. माहिती भवनची संकल्पना महत्त्वपूर्ण असून येथे सुरु करायच्या उपक्रमांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

            राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाचे कौतुक केले. नवी मुंबईतील नेरूळ येथे माहिती भवनाची अत्याधुनिक इमारत विभागाच्या कामकाजास उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. या माहिती भवनामध्ये पत्रकार संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच महासंचालनालयाकडील असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करुन डिजिटल ग्रंथालय लवकरच सुरु होईल. असा विश्वास व्यक्त करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे बळकटीकरणाची ग्वाही यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दिली.

            माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणालेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय वृत्तसंकलनाबरोबरच माहितीचे विश्लेषण देखील करीत असते. अलिकडच्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार विभागाने केल्यामुळे कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. या बदललेल्या कामाच्या पद्धतीसाठी माहिती भवनाची संकल्पना उपयुक्त ठरेल. माहिती भवनसाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेराज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांचे आणि सिडकोचे श्री. कपूर यांनी आभार मानले. या माहिती भवनामध्ये माध्यम प्रतिसाद केंद्रडिजिटल ग्रंथालयमाध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. कपूर यांनी सांगितले.

            यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. सिडकोची ही इमारत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होताआता ही इमारत प्रत्यक्ष आज हस्तांतरित करण्यात येत असल्याचे सांगून या इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डॉ. मुखर्जी यांनी सांगितले.

            या कार्यक्रमास संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळेकोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळेउपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकरसिडकोच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्रिया रातांबे यांचेसह माहिती व जनसंपर्कचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी तर संचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी यांनी आभार मानले.

असे आहे माहिती भवन...

 नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती भवन

 सिडको इमारतीच्या  सुमारे ६ हजार ८८३ चौरस फुट क्षेत्रफळाच्या भव्य जागेत माहिती भवन सुरु होणार.

 तळमजला आणि पहिला मजला असे स्वरुप असलेल्या या इमारतीत कॉन्फरन्स रुमकार्यालयेबहुद्देशीय सभागृहअतिथी कक्षप्रतिक्षा कक्षस्वयंपाकघरवाहनतळ आदी सुविधा.

 इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे २.५८ कोटी रुपये खर्च.

 अद्ययावत स्टुडिओलाईव्ह स्ट्रिमिंग सुविधाराज्यस्तरीय माध्यम प्रशिक्षण केंद्रपत्रकार कक्षग्रंथालयडिजिटल ग्रंथालयविविध प्रकाशनांचे दालनप्रदर्शन दालनदुर्मिळ छायाचित्रांचे दालनदुर्मिळ दृकश्राव्य दालनसमाजमाध्यम कक्षपत्रकार परिषद कक्षमाध्यम प्रतिसाद केंद्र आदींचा माहिती भवनात समावेश

०००००



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...