Sunday, March 10, 2024

 वृत्त क्र. 226

 

दुसऱ्या दिवशीच्या 'शिवगर्जनामहानाट्याला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

· शिवरायांच्या जीवनातील चित्तथरारक प्रसंगानी वेधले प्रेक्षकांचे लक्ष

· आजचा शेवटचा दिवस प्रवेश सर्वांसाठी खुला

· प्रवेश नि शुल्क : प्रथम येणाऱ्यास बैठक व्यवस्थेत प्रथम प्राधान्य

· नागरिकांनी कुटूंबासोबत महानाटयाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

नांदेडदि. 10 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे 9, 10 व 11 मार्च रोजी नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर प्रयोग होत आहेत. काल पहिल्या दिवशी या शिवगर्जना महानाटयाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. आज दुसऱ्या दिवशीच्या महानाट्याच्या प्रयोगाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आजच्या प्रयोगाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला असूनउद्या होणाऱ्या शेवटच्या प्रयोगालाही नागरिकांनी आपल्या कुटूंबासह उपस्थित राहून या शिवगर्जना महानाटयाचा अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे. या महानाटयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचीनितीचीचरित्राचीविचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने महाराजांच्या जीवनावर आधारित महानाटयाचे सादरीकरण 9, 10 व 11 असे तीन दिवस गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वा. होत आहे.

 

उद्या 11 मार्चचा शेवटचा प्रयोग होणार आहे. हा प्रयोग सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या शिवगर्जना महानाट्यात कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगाचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने श्री रायरेश्वर मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथअफजलखानाचा वधग्र्यावरुन सुटकापुरदंरचा तहशाईस्तेखानाची फजिती अशा अनेक घटनांवर आधारित प्रसंग हुबेहुब सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या समोर ऐतिहासिक क्षण डोळ्यापुढे जशाच तसे उभे राहीले.

 

तसेच या कार्यक्रमाच्या सुरवातीला एका कलावंताने संपूर्ण मैदानावर घोडयावर बसून रपेट मारुन सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शिवगर्जना महानाटयाला नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागातून नागरिकांनी गर्दी केली. जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारीकर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची या महानाट्यास उपस्थिती लावली होती. प्रत्येक कुटुंबाने बघावाअसा हा नाट्यप्रयोग उद्या सोमवारी शेवटचा प्रयोग होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000































सुधारित वृत्त क्र. 225

नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

 

नांदेड, दि. 10 : हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी नांदेड विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

 

यावेळी नांदेड येथील विमानतळ कक्षात पदाधिकारी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते हिंगोलीकडे रवाना झाले. हिंगोली येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी 5.15 वा. हेलिकॉप्टरने नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांचे शासकीय विमानाने सायं. 5.27 वा. मुंबईकडे प्रयाण झाले.

0000

छायाचित्र : पुरूषोत्तम जोशी, नांदेड




























समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...