Thursday, January 19, 2023

लेख क्रमांक 1

 लेख

निरोगी आरोग्यासाठी तृणधान्यांचे महत्व !

 

दैनंदिन जीवनात आहारात जंकफूड, मैद्याचे पदार्थबिस्किटतळलेले पदार्थफास्टफूड यांचा मोठया प्रमाणात समावेश दिसून येत आहे. अशा आहारामुळे व खानपानामुळे आरोग्यावर परिणाम होवून विविध गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. आपल्या आहारात पौष्टीक तृणधान्याचा समावेश नसल्याने आरोग्याच्या समस्यात वाढ झालेली आहे.  निरोगी आरोग्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. संतुलित आहारात सर्व प्रकारचे धान्यतृणधान्यपालेभाज्याफळेसुकामेवा आदीचा समावेश असणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी सर्व समावेशक विभिन्नतेचा आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

आपल्या देशात सणाच्या दिवशी पौष्टिक तृणधान्य युक्त पदार्थाचा वापर आहारामध्ये करण्याची परंपरा आहे. तृणधान्याचे आहारातील महत्व ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे.  या अनुषंगाने राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकरी व  सर्व सामान्य व्यक्तींना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेतत्याचबरोबर तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ इ. विषयाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व लोकांना समजण्यासाठी मकर संक्रांती-भोगी हा दिवस या वर्षापासून दरवर्षी पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.

 

तृणधान्यात ज्वारीबाजरीनाचणी व इतर लघु तृणधान्ये राळावरईराजगिरा यांचा तृणधान्यांत समावेश होतो. या तृणधान्यातून कॅल्शियमलोहझिंकआयोडिन इ. सारखे पोषक घटक शरीराला मिळतात. या घटकांमुळे लहान बालके व स्त्रियांना कुपोषण, रक्तक्षयाच्या समस्येपासून दूर ठेवता येते.  पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी विविध विभागांनी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. अन्न धान्यासोबत शेतकऱ्यांनी तृणधान्याचे उत्पादन वाढवावे म्हणून अनेक प्रोत्साहनपर योजना कृषि विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहेत. तसेच बचतगटांच्या माध्यमातून तृणधान्य व तृणधान्यापासून बनविलेले पदार्थ याची विक्री व जनजागृती मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. तृणधान्यांच्या उत्पादनाचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत. शेतकऱ्यांना श्वाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणूनही याकडे बघता येईल. इतर पिकांच्या तुलनेत ही पिके कमी पाण्यावर घेता येतात. तृणधान्य हे अन्नधान्यासोबत जनावरांना चारा म्हणून सुध्दा देता येतात. इतर पिकांच्या तुलनेत कीड-रोग समस्या कमी असते. छोटया क्षेत्रातही ही पिके घेता येतात. पोषक मूल्यांमूळे या पिकांना परिपूर्ण आहार आणि पोषण मिळते.

 

प्रौढ व्यक्तीना दिवसभरात 25 ग्रॅम एवढी फायबरची आवश्यकता असते. तृणधान्यापासून बनवलेल्या दोन ब्रेड मधून सहा ग्रॅम एवढे फायबर मिळते. अर्धी वाटी पांढरे तांदळाच्या भाता मधून दोन ग्रॅम  एवढे फायबर मिळते. अर्धी वाटी ब्राऊन तांदळाच्या भातापासून सहा ग्रॅम एवढे फायबर मिळते. तृणधान्याचे नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. पॉलिश केलेले तृणधान्ये शिजविण्यासाठी सोपे आणि पचनासाठी हलके असते मात्र हे धान्य ज्यावेळी पॉलिश केले जाते त्यावेळी त्यातील पोषण मूल्य निघून जातात. यामुळे चकाकणारा पांढरा तांदूळ असो की चकाकणारी ज्वारी या धान्यातील कोंडा आणि अंकुर हे घटक काढून टाकले जातात. त्यामुळे त्यात फक्त एन्डोस्पर्म हाच घटक उरलेला असतो. पांढऱ्या तांदळात केवळ स्टार्च उरलेला असतो आणि त्यातील जीवनसत्वे कमी प्रमाणात शिल्लक राहतात. आपल्या व आपल्या परिवाराच्या गरजेप्रमाणे आहाराचे नियोजन असले पाहिजे.  तृणधान्याच्या सेवनामुळे 50 टक्के पेक्षा अधिक आजारांना आळा घालने सहज शक्य होईल. आपल्या आहारामध्ये नियमितपणे तृणधान्यांचा समावेश करावा,  आहारात चरबीयुक्त पदार्थाचे सेवन टाळून फायबरचा वापर जास्तीत जास्त करा. फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते तसेच तृणधान्य पचन होण्यास वेळ लागत असल्याने लगेच भूक लागत नाही. तृणधान्याच्या नियमित सेवनामुळे लठ्ठपणामधुमेहहृदयविकारमोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो. मिलेट्स आर कन्सिडर टू बी पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिशन’ हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

उर्मिला जाधव, आहार तज्ज्ञ, पोषण पुनर्वसन केंद्र, स्त्री रुग्णालय, नांदेड

शब्दांकन- अलका पाटील, उपसंपादक, जिमाका, नांदेड

00000



 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2023

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

 

औरंगाबाद,दि.१९, (विमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी,2023 रोजी होणार आहे. ज्या मतदारांना निवडणूक आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे त्यांनी ते सादर करणे आवश्यक आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य

1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी वितरीत केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

 

******

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...