Saturday, July 29, 2017

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांचा दौरा
नांदेड दि. 29 :-  राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 30 जुलै 2017 रोजी मुंबई येथुन विशेष विमानाने सायं. 5.15 वा. श्री गुरु गोविंदसिंग विमानतळ नांदेड येथे आगमन व नांदेड शहराकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. प्रदेश महिला मोर्चा कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.
सोमवार 31 जुलै 2017 रोजी प्रदेश महिला मोर्चा कार्यकारीणी समारोप कार्यक्रमास उपस्थिती बैठकीसाठी राखीव. सोईनुसार नांदेड येथुन हैद्राबादकडे प्रयाण करतील.

000000
अधिस्वीकृतीसाठी पत्रकारांनी
अर्ज करण्याचे आवाहन
         नांदेड, दि. 29 :- लातूर विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक गुरुवार 3 ऑगस्ट 2017 रोजी होणार आहे. नांदेड जिल्हयातील पत्रकारांनी नवीन अधिस्वीकृती पत्रिका मिळविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथ दिनांक 1 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
गुंडेगाव येथे कायदे विषयक शिबीर संपन्न
नांदेड दि. 29 :- ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतुन गुंडेगाव येथे फिरत्या लोकन्यायालयाचे फिरत्या कायदे विषयक शिबीराचे आयोजन आज करण्यात आले होते. 
          
  यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी .टी. वसावे म्हणाले, विधी सेवा प्राधिकरण पिडित गरजु नागरिकांना मोफत विधी सहाय सल्ला उपलब्ध रु देते. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरीक, अपंग व्यक्ती, अनुसुचित जाती, जमातीतील व्यक्ती, बालक, कारागृहातील आरोपी व ज्या व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न 2 लाखा पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींचा विधी सहाय व सल्ला देण्यात येते.
फिरत्या लोक न्यायालयाचे पॅनल प्रमुख निवृत्त जिल्हा न्यायाधीश भीमराव नरवाडे पाटील यांनी उपस्थितांना विविध घटनांची माहिती दे आपसातील वाद वाढवत जाता ते सामोपचाराने मिटवावीत. गुंडेगाव या गावात मागील काही वर्षापासून ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध होत असल्याने गावात कुठलाही तंटा नाही याचे स्वागत करून गावकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
तीन कोटी 15 लाख प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत असून न्याय आपल्या दारी ही संकल्पना अमलात आणुन प्रलंबीत प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोडीने मिटविण्याचे आपला वेळ पैसा वाचवावा लोकन्यायालयात आपली प्रकरणे तडजोडीने मिटविल्यास त्यावर कुठल्याही न्यायालयात अप नसते. यामध्ये कुणी हारत नाही किंवा कोणी जिंकत नाही. दोघांमध्ये वाद विवाद कायमचा मिटतो. त्यामुळे लोकन्यायालयही एक सुवर्ण संधी आहे असे सांगीतले.
स्त्री भृणहत्या, हुंडाबंदी अशा विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. अॅड. एम. एल. गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पुर्वी गुंडेगाव येथील माजी सरपंच दासराव हंबर्डे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एस. जी. इंगळे, अॅड. एस. डी. करकरे, अॅड. प्रदिप शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. हंबर्डे, दत्तराम पाटील, भगवानराव पो. पा., देवराव हंबर्डे, किसन हंबर्डे, रामराव हंबर्डे, शिवहार हंबर्डे, नामदेव हंबर्डे, श्री. ढेपे, गावातील महिला ग्रामस्थ उपस्थित होत.

00000
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती मोठ्या प्रमाणावर मंगळवार 1 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्याचे दृष्टीने मंगळवार 1 ऑगस्ट रोजी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहेत. 
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी मंगळवार 1 ऑगस्ट रोजी नांदेड शहर, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4 व एफएल / बिआर 2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे
0000000
मनपाच्या दलित वस्ती कामांची
पालकमंत्री यांनी स्थगिती उठवली
नांदेड दि. 29 :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेतील विविध कामांना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अर्जुन खोतकर यांनी दिलेली स्थगिती 25 जुलै रोजी उठवली आहे.  
याबाबत पालकमंत्री श्री खोतकर यांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या 68 कामांबद्दल तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या निविदा देखील काढल्या जाऊ नये, असे आदेश दिले होते. सदर निधीची कामे दलित वस्ती बाहेर प्रस्तावित करण्यात आल्याची तक्रार होती. त्यामुळे स्थगिती दिली होती. याबाबत शहानिशा करून व समान निधी वाटप करून 25 जुलै 2017 रोजी स्थगिती उठवण्यात आली आहे. यासाठी आमदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
यासंदर्भात पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दुरध्वनीवर तातडीने संवाद साधला. तसेच याबाबत आयुक्त मनपा नांदेड यांनी कार्यवाही पुर्ण करून तात्काळ निविदा घेउन काम पुर्ण करण्याचे आदेशही पालकमंत्री श्री खोतकर यांनी दिले आहेत.
0000000


जि.प., पं.स निवडणूक खर्च
सादर न केलेले उमेदवार अपात्र
नांदेड दि. 29 :- जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 ची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब राज्‍य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्‍या वेळेत आणि आवश्‍यक केलेल्‍या रितीने सादर न केल्‍यामुळे जिल्ह्यातील 144 उमेदवारांना पुढील पाच वर्षाच्‍या कालावधीसाठी अनर्ह (अपात्र) ठरविण्‍यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
हे.  ‍यात न     जिल्‍हा परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद पंचायत समित्‍या अधिनियम 1961 चे कलम 15 (ब) नुसार जिल्‍हा परिषदेचा सदस्‍य तसेच पंचायत समिती निर्वाचक गणातुन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद पंचायत समित्‍या अधिनियम 1961 चे कलम 62 (अ) नुसार पंचायत समितीचा सदस्‍य होण्‍यासाठी निवडणूक लढविण्‍यास 25 जुलै 2017 पासुन पुढील पाच वर्षाच्‍या कालावधीसाठी अनर्ह ठरविण्‍यात आले आहे. जिल्‍हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमधील अनर्ह झालेले उमेदवार विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांच्‍याकडे विहीत वेळेत अपील दाखल करु शकतात.
जिल्‍हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब राज्‍य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्‍या वेळेमध्‍ये आणि आवश्‍यक केलेल्‍या रितीने सादर न केल्‍यास अशा उमेदवारास अनर्ह ठरविण्‍यास जिल्‍हाधिकारी यांना घोषित केलेले आहे. अनर्ह ठरविण्‍यात आलेल्‍या  उमेदवारांचा तालुका निहाय तपशील पुढील  प्रमाणे आहे.
अनर्ह ठरविण्‍यात आलेल्‍या  उमेदवारांचा तालुका निहाय तपशील खालील प्रमाणे आहे.  लेल्‍या  
तालुका
सदस्‍य
निवडणूक
लढविणाऱ्या
उमेदवारांची संख्या
विहित केलेल्या रितीने खर्चाचा
हिशोब सादर केलेल्या उमेदवारांची संख्या
अनर्ह ठरविण्‍यात आलेल्‍या उमेदवारांची संख्‍या
जि.प.
पं. स.
जि.प.
पं. स.
जि.प.
पं. स.
जि.प.
पं. स.
माहूर
2
4
10
24
10
24
0
0
किनवट
6
12
48
73
39
54
9
19
हिमातयनगर
2
4
13
16
11
10
2
6
हदगाव
6
12
45
54
44
52
1
2
अर्धापूर
2
4
12
20
12
19
0
1
नांदेड
4
8
34
43
25
35
9
8
मुदखेड
2
4
7
17
7
8
0
9
भोकर
3
6
16
31
16
30
0
1
उमरी
2
4
9
22
8
22
1
0
धर्माबाद
2
4
12
20
12
16
0
4
बिलोली
4
8
26
36
17
29
9
7
नायगाव खै.
4
8
21
39
18
35
3
4
लोहा
6
12
28
57
27
56
1
1
कंधार
6
12
29
56
26
53
3
3
मुखेड
7
14
33
56
23
44
10
12
देगलूर
5
10
31
39
27
24
4
15
एकुण
63
126
374
603
322
511
52
92

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...