कापुस
पिकावरील शेंदरी बोंडअळीचे
एकात्मिक
व्यवस्थापन
नांदेड, दि. 29
:- जिल्हयात नगदी पिक म्हणून कापूस पिक
हे मोठया प्रमाणात घेतले जाते. या हंगामात देखील मोठया
प्रमाणात कापूस पिकांची लागवड केलेली आहे. यातच कापूस पिकावर येणाऱ्या किडी विषयी व भविष्यातील धोका लक्षात
घेऊन आता पासूनच शेंदरी बोंड अळीचे
नियोजन करणे महत्वाचे आहे, असे कृषि तंत्रज्ञान
व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक एम. टी. गोंडेस्वार यांनी प्रसिद्धी
पत्रकात म्हटले आहे.
शेंदरी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापनात सर्व प्रथम किडीची ओळख, कोष आवस्था
लालसर तपकिरी रंगाची तर पतंग करडया
रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी ही
लांबट असून तिचे पूर्ण शरीर हे गुलाबी दिसते. शेंदरी बोंड अळीची
आर्थिक नुकसान स्तर पातळी ओळखण्यासाठी प्रत्येक आठवडयात पिकाची पाहणी करावी. पाहणीसाठी 3 कामगंध सापळे प्रती
एकर उभारावेत. प्रत्येकी 20 फुले किंवा 20 बोंडे पैकी रॅन्डम पध्दतीने पाहणी करावे. पाहणी करताना प्रत्येकी कामगंध सापळयामध्ये सलग 3 दिवस
8 पुरुष पतंग आढळल्यास किंवा 2 डोमकळया किंवा
2 बोंडे प्रत्येकी 20 फुलापैकी किंवा
20 बोंडा पैकी रॅन्डम पध्दतीनी पाहणी करताना शेंदरी बोंड आळीने प्रभावग्रस्त आढळल्यास आर्थिक नुकसानस्तर पातळी ओलांडली आहे, असे समजावे. 90 दिवसापर्यंत क्विनॉलफॉस 25 ईसी / प्रोफेनोफॉस
50 ईसी / थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी / लॅमडा
सायहॅलोथ्रीन 5 ईसी / सायपरमेथ्रीन 10 ईसी
या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. तसेच सेंद्रीय बोंड आळीचे पुरुष पतंग जास्तीतजास्त अडकविण्यासाठी प्रती एकर 8 कामगंध सापळे लावावेत. भविष्यात
उदभवणाऱ्या समस्यांचे योग्य वेळीच उपाय करुन बंदोबस्त करावा.
00000
No comments:
Post a Comment