Saturday, July 29, 2017

मनपाच्या दलित वस्ती कामांची
पालकमंत्री यांनी स्थगिती उठवली
नांदेड दि. 29 :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेतील विविध कामांना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अर्जुन खोतकर यांनी दिलेली स्थगिती 25 जुलै रोजी उठवली आहे.  
याबाबत पालकमंत्री श्री खोतकर यांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या 68 कामांबद्दल तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या निविदा देखील काढल्या जाऊ नये, असे आदेश दिले होते. सदर निधीची कामे दलित वस्ती बाहेर प्रस्तावित करण्यात आल्याची तक्रार होती. त्यामुळे स्थगिती दिली होती. याबाबत शहानिशा करून व समान निधी वाटप करून 25 जुलै 2017 रोजी स्थगिती उठवण्यात आली आहे. यासाठी आमदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
यासंदर्भात पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दुरध्वनीवर तातडीने संवाद साधला. तसेच याबाबत आयुक्त मनपा नांदेड यांनी कार्यवाही पुर्ण करून तात्काळ निविदा घेउन काम पुर्ण करण्याचे आदेशही पालकमंत्री श्री खोतकर यांनी दिले आहेत.
0000000


No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...