Tuesday, April 9, 2024

 वृत्त क्र.  323 

वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह,

ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

 

नांदेड दि. 9 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 8 ते 12 एप्रिल 2024 हे पाच दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 8 ते 12 एप्रिल 2024 ह्या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 322

नांदेड जिल्‍ह्यात मतदानाच्‍या दिवशीचे सर्व आठवडी बाजार बंद राहणार


नांदेड व हिंगोलीसाठी 26 एप्रिल ; तर लातूरसाठी 7 मे ला बंद

 

नांदेड दि. 9 :- नांदेड जिल्‍ह्यातील जे विधानसभा क्षेत्र  नांदेड, हिंगोली व लातूर मतदार संघात येतात त्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी येणा-या बाजाराच्‍या तारखांमध्‍ये बदल केला आहे. मतदानाच्‍या दुस-या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहे. जिल्‍हाधिका-यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत.

 

या ठिकाणी २६ एप्रिलला बंद

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 83-किनवट, 84-हदगाव व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील 85-भोकर, 86-नांदेड उत्तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड या विधानसभा मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.   

 

शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी हदगाव तालुक्यात हदगाव, किनवट तालुक्यात इस्लापूर, माहूर तालुक्यात सिंदखेड, अर्धापूर तालुक्यात अर्धापूर, धर्माबाद तालुक्यात करखेली, कारेगाव फाटा, नायगाव खै. तालुक्यात बरबडा, देगलूर तालुक्यात माळेगाव म., बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहर, आदमपूर, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद, जांब बु. तर नांदेड येथील साठे चौक ते आयटीआय रस्ता, शिवाजीनगर ते ज्योती टॉकीज रोड तसेच गोकुळनगर ते रेल्वेस्टेशन या मार्गावर व रोड क्र. 26 येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 27 एप्रिल 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

 

याठिकाणी ७ मे रोजी बंद

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील 88-लोहा या विधानसभा मतदारसंघात मंगळवार मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.   

 

मंगळवार 7 मे 2024 रोजी लोहा तालुक्यातील मारतळाकलंबर व लोहा येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार 8 मे 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

00000 

वृत्त क्र. ३२१

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त

मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

 

नांदेड दि. 9 :- जागतिक आरोग्य दिन हा एप्रिल रोजी सर्वत्र साजरा केला जातो. यावर्षीचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य "माझे आरोग्य माझा अधिकार" हे आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीजनऔषध वैद्यशास्त्र विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. फॅमेली अॅडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत मार्कंड हे गाव वैद्यकीय महाविद्यालयाने दत्तक घेतलेले आहे. त्याअनुषंगाने येथे नियमित कुटुंब आरोग्य तपासणी करण्यात येते.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. पी. एल. गट्टाणी तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. आर डी. गाडेकरडॉ. आय. एफ. इनामदार डॉ. ज्योती भिसे प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिका अचमवाडमुख्याध्यापिका सौ वंदना चव्हाणग्रामसेवक टि. एम. शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. गट्टाणी यांनी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपचार आणि निरोगी आरोग्यआहारतसेच वायुप्रदुषणामुळे होणारे आजार टाळण्यासाठी सामुहिकरित्या पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे महत्व पटवून दिले.

 

या आरोग्य शिबीरामध्ये जनऔषध वैद्यकशास्त्रऔषध वैद्यकशास्त्रनेत्र शल्यचिकीत्साशास्त्र तसेच बालरोगशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबीरात 146 महिला, 107 पुरुष व 85 बालके असे एकूण 338 रुग्णाची तपासणी करुन त्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले व आवश्यकतेप्रमाणे काही रुग्णांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे संदर्भित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. फिरोज शेख तर आभार डॉ. संतोष जोगदंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सर्व निवासी डॉक्टरसमाजसेवा अधिक्षक गजानन वानखेडेप्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

0000

वृत्त क्र. ३२०

 उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 16 ते 25 एप्रिल कालावधीत आयोजन 

नांदेड दि. 9 एप्रिलः - क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयजिल्हा क्रीडा परिषदव नांदेड जिल्हा विविध एकविरा क्रीडा संघटना यांचे संयुक्‍त विद्यमाने विविध खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबीर 16 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत सर्व वयोगटातील विद्यार्थी खेळाडूंसाठी मोफत असणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभागी होणेसाठी 15 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत आपली नांवे चंद्रप्रकाश होनवडजकर (7972953141), बालाजी शिरसीकर (7517536227), श्रीमती शिवकांता देशमुख (9657092794) यांचेकडे नोंदणी करावेत व अधिक माहितीकरीता संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

 

यामध्ये विविध खेळातील बदलणारे तंत्रज्ञानखेळाच्या नियमातील बदलसद्यस्थीत खेळाचे राज्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय पातळीवरील अद्यावत स्थितीबाबत नांदेड जिल्हयातील खेळाडूंना या कार्यालयामार्फत अद्यावत ज्ञानप्रात्याक्षिक व इतर विविध पध्दतीने तज्ञ प्रशिक्षकअनुभवी खेळाडू आणि विविध पदाधिकारी यांच्याद्वारे देण्यात येणार आहे. हे शिबीर सन 2024-25 च्या स्पर्धेची पूर्वतयारी लक्षात घेऊन निश्चि करण्यात आलेला आहे. तसेच या शिबीरामध्ये शासनाचे क्रीडा मार्गदर्शक तसेच विविध खेळ संघटनाइतर अकॅडमीचे तज्ञ क्रीडा मार्गदर्शकराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय खेळाडू व तज्ञ पदाधिकारी यांच्याद्वारा खेळनिहाय तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

यामध्ये आर्चरीटेनिक्कॉईटमैदानीजिग्रॅस्टिक्सतलवारबाजीसिकाई मार्शल आर्टबास्केटबॉलबॅडमिंटनबॉक्सींगखो-खोबुध्दीबळज्युदोसेपक टकरोंनेटबॉलटेबल टेनिसफुटबॉलसॉफटबॉलकराटेकॅरमरग्बीतेंग-सु-डोबेल्ट-रेसलींगहॉकीतायक्काँदोहॅन्डबॉलमल्लखांबस्केटींगबेसबॉल व इतर खेळाचा समावेश असुन नांदेड शहरातील व जिल्हयातील विविध ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्र. ३१९

 निवडणूक निरीक्षकांची विष्‍णुपूरी इकोफ्रेंडली मतदान केंद्रास भेट 

नांदेड दि. ९ एप्रिलः - १६- नांदेड लोकसभा निवडणुकीचे सामान्‍य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी नांदेड दक्षिणच्या २५३ मतदान केंद्र विष्णुपूरीस आज भेट दिली. संपूर्णतः पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली मतदान केंद्राची केलेली नैसर्गिक रचना पाहून मिश्रा यांनी या केंद्रावरील मतदान टक्केवारी पूर्वीपेक्षा नक्कीच वाढणार, असा विश्वास व्यक्त केला. या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्राची तयारी आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली.

 

यावेळी निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी मतदान केंद्राचे निरीक्षण केले आणि मतदान अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 087 स्वीप कक्षाचे प्रमुख रुस्तुम आडेसदस्य संजय भालकेमुख्याध्यापक उज्ज्वला जाधवदिनेश अमिलकंठवारग्राम विकास अधिकारी संजय कानोडेपर्यवेक्षक शिवाजी वेदपाठकमतदार विलास हंबर्डेगोविंदराव हंबर्डे उपस्थित होते.

 

निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी मतदान केंद्रावरील सुविधामतदार यादीमतदान यंत्रे आणि इतर साहित्याची तपासणी केली. मतदान केंद्राची व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेची तयारी पाहून समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. तसेच या भेटीमुळे 16 नांदेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होईलअसा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला. या भेटीचे अहवाल लेखन राजेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद वळगेदत्ता केंद्रेउदय हंबर्डेविकास दिग्रसकरमारोती काकडेपंचफुला नाईनवाडकांचनमाला पटवे आदींनी परिश्रम घेतले.

०००००






महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...