Wednesday, May 3, 2023

 मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :-   मधमाशा उद्योगामध्ये सातेरीमेलीफेरा  आग्या मधमाशाचे संगोपन करुन मधाचे उत्पादन घेण्याऱ्या व्यक्तीसंस्था यांची मित्र पुरस्कारासाठी निवड करण्यांत येणार आहे. इच्छुक व्यक्ती, संस्था यांनी या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य खादी  ग्रामोद्योग मंडळउद्योग भवनशिवाजी नगरनांदेड येथे अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शिवशंकर तानाजीराव भोसीकर व मधुक्षेत्रिक शंकर नारा खंदारे यांच्याशी तसेच दु.क्र. 02462-240674 9921563053 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड केले आहे.

 

मध संचानालय महाराष्ट्र राज्य खादी  ग्रामोद्योग मंडळमहाबळेश्वरजिल्हा सातारा येथे  20 मे 2023 रोजी जागतीक मधमाशी दिनाचे औचित्य साधुन मधमाशा पालन उद्योगांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या लाभार्थीस मधमाशी मित्र पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. मंडळाचे मध संचानालय महाबळेश्वर येथे पुरस्कार वितरण सोहळा 20 मे 2023 रोजी आयोजीत केलेला आहे असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.   

00000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...