Thursday, September 21, 2017

चलनातील दहा रुपयाचे नाणे वैध ;
चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका
नांदेड दि. 21 :- चलनात असलेले दहा रुपयाचे नाणे वैध चलन असून ते बंद झालेले नाही, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक विजय उशिर यांनी दिली आहे.
बिलोली तालुक्यात सर्वसाधारण नागरीक व दुकानदार 10 रुपयाचे नाणे स्विकारत नाहीत, कारण हे नाणे बंद आहे अशी चुकीची अफवा पसरविली जात आहे त्यावर विश्वास ठेवू नये. चलनात 10 रुपयाचे नाणे वैध आहे. त्यामुळे नागरिक व दुकानदाराने हे नाणे स्वीकारावेत असेही त्यांनी कळविले आहे.
00000


संस्थांनी ऑडिट रिपोर्ट, बदलाचे अर्ज
30 सप्टेंबर पर्यंत सादर करावीत
- धर्मादाय उपआयुक्त श्रीनीवार
नांदेड दि. 21 :-  गेल्या पाच वर्षातील ऑडिट रिपोर्ट, बदल अर्ज सादर न करणाऱ्या संस्थाची नोंदणी रद्द केली जाणार आहे. यासाठी 1 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर 2017 अशी तीन महिने विशेष  मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्या ट्रस्ट कार्यरत असल्याबाबतचा ऑडिट रिपोर्ट, बदल अर्ज आदी पुरावे दयायचे आहे त्यांनी शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन नांदेडचे धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी केले आहे.
गेल्या पाच वर्षांतील ऑडीट रिपोर्ट, बदल अर्ज न देणाऱ्या ट्रस्टची 1 ऑक्टोंबर 2017 नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरु केली जाणार आहे. ज्या ट्रस्टची नोंदणी रद्द होईल त्या ट्रस्टच्या सोसायटीची नोंदणी आपोआपच रद्द होणार आहे. नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टचे सर्व फंड हे राज्य शासनाच्या पी.टी.ए. (पब्लिक ट्रस्ट फंड अॅक्टिवेशन फंड) मध्ये जमा केला जाणार आहे. ट्रस्टच्या नावे जमा केलेली स्थावर मालमत्ता त्यांचा लिलाव केला जाईल त्यातुन जमा होणार रक्कम पी.टी.ए. फंडमध्ये जमा केली जाणार आहे.
ट्रस्ट स्थापनेचा उद्देश सफल झाला आहे, ट्रस्टचे कामकाज करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ नाही आदी कारणास्तव ज्यांना ट्रस्टची नोंदणी स्वत:हुन रद्द करायची आहे तसेच ट्रस्ट अन्य दुसऱ्या ट्रस्टकडे हस्तांतरीत करायचा आहे त्यांनीही 30 सप्टेंबर 2017 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. वाद नसलेले बदल अर्ज व न्यास नोंदणी प्रकरणेही 30 सप्टेंबर निकाली काढण्यात  येणार आहेत. नोंदणी अर्ज, कलम 41 - क अंतर्गत परवाने, संस्था व ट्रस्ट नोंदणी अर्ज, संस्थेविषयी तक्रार, संस्थेचे लेखापरिक्षण अहवाल सादर करणे, आदी कामे ऑनलाईन करण्यात आली आहेत, असेही आवाहन धर्मादाय उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.

00000
राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाचे
अध्यक्ष व सदस्य यांचा किनवट दौरा
नांदेड दि. 21 :- राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई व सदस्य श्रीमती माया चिंतामन इवनाते हे किनवट दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 23 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथुन मोटारीने सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह किनवट येथे आगमन. दुपारी 12 वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह व रघुनाथशाह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती. स्थळ- कलावती गार्डन माहूर रोड किनवट. सायंकाळी 5 वा. किनवट येथुन वाहनाने यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000
हलके मोटार वाहन लायसन्ससाठी आवाहन
नांदेड दि. 21 :- परिवहन संवर्गातील हलके मोटार वाहनाच्या लायसन्ससाठी हलके मोटार वाहन चालविण्याचा एक वर्षाच्या अनुभवाची आवश्यकता नाही. तथापि अशा संवर्गाच्या अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय 20 वर्ष पूर्ण असणे, शैक्षणीक अर्हता किमान 8 वी उत्तीर्ण असणे, तसेच अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

परिवहन संवर्गातील हलके मोटार वाहन चालविण्याच्या लायसन्ससाठी अर्ज करताना विहित अटींची र्तता केल्यास त्यांना शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे https://parivahan.gov.in/sarathiservice या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. संबंधीत नागरिकांनी, ड्रायव्हींग स्कलच्या मालकांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
"जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताह" संपन्न
आत्महत्येची कारणे, उपाय योजनेबाबत मार्गदर्शन
नांदेड दि. 21 :- श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला. जिल्हा, तालुका व गावपातळीवर विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह समारोप कार्यक्रमात प्रकल्प प्रेरणा कार्यक्रम अधिकारी मानसोपचार तज्ञ डॉ. प्रणद जोशी यांनी आत्महत्येची कारणे व विविध उपाय योजनेबाबत मार्गदर्शन केले. नैराश्यग्रस्त व्यक्तीला औषधोपचार व समुपदेशन वेळीच मिळाले तर आपण आत्महत्या रोखू शकतो, असे प्रतिपादन डॉ. जोशी यांनी केले.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर यांचे सहकार्य लाभले. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यु. एम. इंगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थीनीने श्रीमती कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाटय व काव्यवाचन करुन जनजागृती केली. शासकीय परिचर्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जोशी उपस्थित होते. सुत्रसंचलन शीतल उदगीरकर यांनी केले.
हा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रेरणा प्रकल्प कार्यक्रम चिकित्सालयीन मानसशास्त्र कैलास चव्हाण, परिचारिका श्रीमती रुपाली मस्के, वंदना कसपटे, राहुल कऱ्हाळे यांनी संयोजन केले.
000000



महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...