संस्थांनी ऑडिट रिपोर्ट, बदलाचे अर्ज
30 सप्टेंबर पर्यंत सादर करावीत
- धर्मादाय उपआयुक्त श्रीनीवार
नांदेड दि. 21 :- गेल्या पाच वर्षातील ऑडिट रिपोर्ट, बदल अर्ज
सादर न करणाऱ्या संस्थाची नोंदणी रद्द केली जाणार आहे. यासाठी 1 ऑक्टोंबर ते 31
डिसेंबर 2017 अशी तीन महिने विशेष मोहिम
राबविण्यात येणार आहे. ज्या ट्रस्ट कार्यरत असल्याबाबतचा ऑडिट रिपोर्ट, बदल अर्ज आदी पुरावे दयायचे आहे त्यांनी शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर
करावीत, असे आवाहन नांदेडचे धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी केले
आहे.
गेल्या
पाच वर्षांतील ऑडीट रिपोर्ट, बदल अर्ज न देणाऱ्या ट्रस्टची 1 ऑक्टोंबर 2017
नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरु केली जाणार आहे. ज्या ट्रस्टची
नोंदणी रद्द होईल त्या ट्रस्टच्या सोसायटीची नोंदणी आपोआपच रद्द होणार आहे. नोंदणी
रद्द झालेल्या ट्रस्टचे सर्व फंड हे राज्य शासनाच्या पी.टी.ए. (पब्लिक ट्रस्ट फंड
अॅक्टिवेशन फंड) मध्ये जमा केला जाणार आहे. ट्रस्टच्या नावे जमा केलेली स्थावर
मालमत्ता त्यांचा लिलाव केला जाईल त्यातुन जमा होणार रक्कम पी.टी.ए. फंडमध्ये जमा
केली जाणार आहे.
ट्रस्ट
स्थापनेचा उद्देश सफल झाला आहे, ट्रस्टचे कामकाज करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ नाही
आदी कारणास्तव ज्यांना ट्रस्टची नोंदणी स्वत:हुन रद्द करायची आहे तसेच ट्रस्ट अन्य
दुसऱ्या ट्रस्टकडे हस्तांतरीत करायचा आहे त्यांनीही 30
सप्टेंबर 2017 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार
आहे. वाद नसलेले बदल अर्ज व न्यास नोंदणी प्रकरणेही 30
सप्टेंबर निकाली काढण्यात येणार आहेत. नोंदणी
अर्ज, कलम 41 - क
अंतर्गत परवाने, संस्था व ट्रस्ट नोंदणी अर्ज, संस्थेविषयी तक्रार, संस्थेचे लेखापरिक्षण अहवाल
सादर करणे, आदी कामे ऑनलाईन करण्यात आली आहेत, असेही आवाहन धर्मादाय उपआयुक्त
नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment