Tuesday, June 25, 2019


राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त
सामाजिक न्याय दिनी समता दिंडीचे आयोजन
  • जिल्हा व तालुकास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार

नांदेड, दि. 25:- राजर्षी छत्रपती शाहु महाराज सत्तेवर कार्यरत असतांना आपल्या कार्य कालावधीत सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते. समाजातील दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटकांच्या प्रती त्यांचा ष्टीकोन विशेष सहानुभुती पुर्वक होता. मागासवर्गीय, दिव्यांग, वृध्द, निराधार, दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणार्थ त्यांनी अनेक निर्णय अंमलात आणले. त्यांचा आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा या दृष्टीकोनातुन त्यांचा जन्मदिवस दिनांक 26 जून प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय शासनाने सन 2003 पासुन घेतलेला आहे.  
            त्याअनुषंगाने सन 2003 पासुन जिल्हा स्तरावर तालुकास्तरावर ,सर्व शासकीय कार्यालये, अनुदानित कार्यालये ,महाविद्यालये, शाळा, इत्यादी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये  दिनांक 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
दिनांक 26 जून 2019 रोजी जिल्हास्तरांवर विविध कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत  करण्यात आलेले आहे. बुधवार 26 जून 2019 रोजी सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासुन  समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा, शासक विश्रागृह समोरील मार्ग ते पावडेवाडी नाका ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत राहणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून होणार असून हा कार्यक्रम  खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पोलीस अधिक्षक, आयुक्त नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा रिषद नांदेड या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न होणार आहे. तसेच  सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह नांदेड येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
जवाहरलाल नेहरु समाज कार्य वीन नांदेड येथे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणीक कार्य  या विषयावर निंबध स्पर्धा समाजिक समता काळाची गरज या विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली होती. या स्पर्धैत प्रथम, द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये  सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत सर्व तालुकास्तरांवर सामाजिक न्याय दिनांचे आयोजन करण्याबाबत जिल्हास्तरीय सामाजिक न्याय शक्ती प्रदत्त समितीची बैठक 24 जून 2019 रोजी  झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलस्तरावर तसेच तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयात सामाजिक न्याय दिनानिमित्त कार्यक्रम आयोजि करण्याबाबत प्रत्येक तालुक्यास निधी उपलब्ध करुन देण्यात आला असू सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी  यांना  तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधीचा सहभाग घेवू विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
26 जुन 2019 रोजी सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्या जातील यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सदस्य सचिव, सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समिती तथा सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
0000

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन



नांदेड, दि. 25 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 1 जुलै 2019 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


वाहन भाडेतत्वावर घेण्यासाठी
दरपत्रक मागविण्याचे आवाहन
नांदेड दि. 25 :- सहायक संचालक नगर रचना नांदेड कार्यालयासाठी भाडे तत्वावर Swift Dizire / Ford Aspire / Indigo / Sedan Cars  या सारख्या वाहनाची आवश्यकता आहे. त्यासाठी वाहन मालकाकडून इंधनविरहित दरपत्रक (प्रती दिन प्रमाणे) मागविण्यात येत आहे. दरपत्रके सिलबंद पाकिटात सोमवार 15 जुलै 2019 रोजी सायं 5 वाजेपर्यंत सहायक संचालक नगर रचना नांदेड कार्यालयाकडे पोहचतील अशा बेताने पाठविण्यात यावे, असे आवाहन सहायक संचालक नगर रचना नांदेड यांनी केले आहे.
दर, निविदेच्या अटी व शर्ती सहायक संचालक नगर रचना नांदेड या कार्यालयाच्या सूचना फलकावर पहावयास मिळतील. कार्यालयाचा पत्ता सहायक संचालक नगररचना नांदेड शाखा, घोडजकर इमारत, दुसरा मजला गांधीनगर, हिंगोली नाका, नांदेड पिन कोड 431605 आहे, असेही आवाहन सहायक संचालक नगररचना नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  
000000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 25 :- जिल्ह्यात 9 जुलै 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 25 जून 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 9 जुलै 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


शासकीय तंत्र प्रशाला केंद्रात
व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु 
नांदेड, दि. 25 :-  इयत्ता दहावी उत्तीर्ण / दहावी एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र भारत गॅस एजन्सी समोर बाबानगर नांदेड या संस्थेतील विविध व्यवसाय अभ्यासक्रमास (इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, ॲटोमोबॉईल टेक्नॉलॅाजी व कॉम्पुटर टेक्नॉलॉजी) शैक्षणिक वर्षे 2019-2020 साठी प्रवेश सुरु आहे.
हा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला शासकीय / निमशासकीय / खाजगी कंपनीत नौकरीची संधी प्राप्त आहे. मर्यादित जागा असल्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संस्थेत (02462-259139) संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक एम. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...