शासकीय तंत्र प्रशाला केंद्रात
व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 25
:- इयत्ता दहावी उत्तीर्ण /
दहावी एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र भारत गॅस एजन्सी
समोर बाबानगर नांदेड या संस्थेतील विविध व्यवसाय अभ्यासक्रमास (इलेक्ट्रीकल
टेक्नॉलॉजी, ॲटोमोबॉईल टेक्नॉलॅाजी व कॉम्पुटर टेक्नॉलॉजी) शैक्षणिक वर्षे
2019-2020 साठी प्रवेश सुरु आहे.
हा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला शासकीय / निमशासकीय
/ खाजगी कंपनीत नौकरीची संधी प्राप्त आहे. मर्यादित जागा असल्यामुळे इच्छूक
विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संस्थेत (02462-259139) संपर्क साधावा, असे आवाहन
मुख्याध्यापक एम. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment