Friday, September 24, 2021

 ः प्रेसनोट:


राष्ट्रीय लोकअदालत 
दि. 25 सप्टंेबर, 2021 रोजी

नांदेड:- मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे दिनांक  25/09/2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय, नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

  सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. 

  याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम, वाहतूक शाखा, व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

  या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्टीªय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मा. श्री श्रीकांत ल. आणेकर,  प्रमुख जिल्हा न्यायाधीश, तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड व न्यायाधीश श्री. आर. एस. रोटेे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.. 
  तरी सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 25/09/2021 रोजी होणाÚया राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उपस्थित राहून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा.

 अमृत महोत्सवानिमित्त इंडिया रनचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  नेहरु युवा केंद्र संगठन युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकारच्यावतीने जन आंदोलनात सर्वाचा सहभाग या थिमप्रमाणे देशभरात 744 जिल्ह्यात व जिल्ह्यातील 75 गावामध्ये 13 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत फिट इंडिया रनचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शनिवार 25 सप्टेंबर रोजी जवळपास 100 युवक-युवती सहभागी होवून दौड होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरपोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

यामध्ये सर्व विभागाचे विभागप्रमुख, विविध क्रीडा संगठनायुवक मंडळप्रतिनिधी व स्वयंसेवक यांचा सहभाग राहील. या रॅलीची सुरुवात सकाळी 7 वाजता आयटीआय पासून अण्णाभाऊ साठे चौक मार्गे स्टेडियम येथे होणार आहे. या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व भारताच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हावेअसे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

 0000

  आरोग्य विभागातील परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू

नांदेड (जिमाका) दि. 24  : आरोग्य विभागातील गट –क व गट- ड पदभरतीची परीक्षा 25  व 26 सप्टेंबर रोजी 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.  

परीक्षा केद्राच्या  परिसरात बाहेरील व्यक्तीचा उपद्रव होवू नये आणि परीक्षा सुसंगत पार पाडण्याच्या दृष्टिने शनिवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2  व रविवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एस.टी.डी/आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स/आणि ध्वनीक्षेपक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही. असे आदेश जिल्हाप्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.  

 

परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना

सानुग्रह अनुदान जाहिर

नांदेड (जिमाका) दि. 24  : कोविड 19 च्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने  नांदेड जिल्ह्यातील सर्व परवानाधारक ऑट्रोरिक्षा चालकांना रु 1500 रुपयाचे सानुग्रह अनुदान जाहिर केले आहे. अनुदान ऑट्रोरिक्षा चालकांना ऑनलाईन पध्दतीने  बँकेत जमा होणार आहेत.

ज्या परवानाधारक चालकांचे बँक खाते आधारशी लिक नाही अशा परवानाधारकांनी  कार्यालयामध्ये मॅन्युअल पध्दतीने फार्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.सदर फार्म भरण्यासाठी वाहन धारकांनी  विधिग्राह परवाना,लायन्सस, आर.सी.विमा, बँक खाते चेक बुक इत्यादी कागदपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन जमा करावी. सदर योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभाग यांनी केले आहे.

 आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ठरतेय नवसंजीवनी

नांदेड :-

  आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने १५ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ पंधरवडा साजरा करण्यात येत असून २३ सप्टेंबर २०२१ रोजी आयुष्यमान भारत दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी आयुष्यमान भारत दिवसाचे औचित्य साधून डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे सर्व रुग्णांना मिठाईचे डब्बे, फळे, तसेच माहिती पुस्तिका वाटप करण्यात आले इतर संलग्नीकृत रुग्णालयात आरोग्यमित्रांनी लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड चे वाटप तसेच माहिती पुस्तिका वाटप करून साजरा केला आहे यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटी चे जिल्हा समन्वयक डॉ दिपेशकुमार शर्मा अंमलबजावणी साहाय्य संस्थेचे (एम.डि.इंडिया टीपीए) विभागीय प्रमुख श्री शरद.पवार, विभागीय दक्षता अधिकारी श्री बाबासाहेब लोखंडे, जिल्हा प्रमुख स्वप्नील देशमुख, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, डॉ प्रेमकिशोर वाळवंटे, पर्यवेक्षक अब्दुल रौफ, श्रीमती.प्रियांका अहिरे इतर कर्मचारी उपस्थित होते.

         आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात २३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण भारतात राबविण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना महाराष्ट्रात एप्रिल २०२० पासून एकत्रित रित्या राबविण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून याचा लाभ कमाल मर्यादा लाख रु प्रति कुटुंब प्रति वर्ष घेता येणार आहे. या साठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अन्यथा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा.

   या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर ३४ विशेष श्रेणीत  उपचार असून त्या मध्ये १०३८ उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात तसेच १७१ उपचार हे शासकीय रुग्णालयांतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. या मध्ये प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, तसेच मानसिक आजारावरील उपचार आहेत. या योजनेचा लाभ नांदेड जिल्यातील जवळपास १२२०८३ कुटुंबांना होणार असून नांदेड मध्ये  आज पर्यंत २६८५३ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे.

    या योजनेचा लाभ घेण्या करिता आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे, ज्या कुटुंबाची नावे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब मध्ये आहेत त्यांना हे आयुष्यमान कार्ड संलग्नीकृत रुग्णालयात मोफत तसेच आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर येथे बनवून दिले जाते, या करिता सर्व लाभार्थ्यांनी मूळ शिधा पत्रिका आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासन मान्य मूळ ओळख पत्र सोबत घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा कॉमन सर्विस सेंटर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ दिपेशकुमार शर्मा यांनी केले आहे.

0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...