Wednesday, May 4, 2022

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 31 अहवालापैकी एकही अहवाल कोरोना बाधित नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 804 एवढी झाली असून यातील 1 लाख 110 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.

 

आज उपचार घेत असलेल्या बाधितामध्ये नांदेड मनपा अंतर्गत  गृह विलगीकरणात 1नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 921

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 80 हजार 997

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 804

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 110

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-02

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 000000

 जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत ल.आणेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.

 
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी,
 मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोक न्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.

याशिवाय या लोकअदालतीत विद्युत कंपनी,
 विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पक्षकारांनी येताना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी माहे मे ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत तालुका शिबीर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन आहे. या शिबीरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईंटमेंट प्रत्येक महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारानी याबाबत नोंद घ्यावी व शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

तालुकानिहाय शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. मुखेड येथे 9 मे, 8 जून, 8 जुलै , 8 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 7 ऑक्टोंबर 2022 तर किनवट येथे 13 मे, 13 जून, 13 जुलै, 12 ऑगस्ट, 13 सप्टेंबर, 13 ऑक्टोंबर 2022 आहे. तर हदगाव येथे 20 मे, 20 जून, 20 जुलै, 19 ऑगस्ट, 20 सप्टेंबर, 19 ऑक्टोंबर 2022 आहे. धर्माबाद येथे 23 मे, 23 जून, 22 जुलै, 22 ऑगस्ट, 22 सप्टेंबर, 21 ऑक्टोंबर 2022 आहे. हिमायतनगर येथे 27 मे, 27 जून, 27 जूलै, 26 ऑगस्ट, 26 सप्टेंबर, 28 ऑक्टोबर 2022 याप्रमाणे आहे. माहूर येथे 31 मे, 29 जुन, 29 जुलै, 29 ऑगस्ट, 29 सप्टेंबर, 31 ऑक्टोंबर 2022 रोजी आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

000000

जिल्ह्यात फिरते लोकअदालत

व कायदेविषयक शिबिराचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- समाजाच्या तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दिष्ट ठेवून मा. सर्वोच्य न्यायालय दिल्ली यांच्या ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन जिल्ह्यातील निवडक तालुक्यांच्या निवडक गावामध्ये मे ते 21 मे 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. हे फिरते लोकअदालत यशस्वी करण्यासाठी गावातील लोकांनी सहकार्य करावे. तसेच या फिरत्या लोकअदालतचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर.एस.रोटे यांनी केले आहे.

 

नुकतेच जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर यांच्या हस्ते फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथून या लोक अदालतीसाठी आलेल्या मोबाईल व्हॉनचे उदघाटन करण्यात आले. मे ते 21 मे 2022 या कालावधीत हे फिरते लोक अदालत नांदेड जिल्हातील निवडक तालुक्यातील नियोजीत गावात फिरुन न्यायालयात प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅकांचेविमा कंपनीचे विद्युत महामंडळाचेबीएसएनल व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहे. या कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणुन सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सौ. कमल वडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

 महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दौरा 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

बुधवार 4 मे 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सायंकाळी 7.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सायं. 8 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

 

गुरुवार 5 मे 2022 रोजी श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम येथे आगमन व औरंगाबाद विभागीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा-2022 च्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील.

000000  

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...