Wednesday, May 4, 2022

 शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी माहे मे ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत तालुका शिबीर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन आहे. या शिबीरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईंटमेंट प्रत्येक महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारानी याबाबत नोंद घ्यावी व शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

तालुकानिहाय शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. मुखेड येथे 9 मे, 8 जून, 8 जुलै , 8 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 7 ऑक्टोंबर 2022 तर किनवट येथे 13 मे, 13 जून, 13 जुलै, 12 ऑगस्ट, 13 सप्टेंबर, 13 ऑक्टोंबर 2022 आहे. तर हदगाव येथे 20 मे, 20 जून, 20 जुलै, 19 ऑगस्ट, 20 सप्टेंबर, 19 ऑक्टोंबर 2022 आहे. धर्माबाद येथे 23 मे, 23 जून, 22 जुलै, 22 ऑगस्ट, 22 सप्टेंबर, 21 ऑक्टोंबर 2022 आहे. हिमायतनगर येथे 27 मे, 27 जून, 27 जूलै, 26 ऑगस्ट, 26 सप्टेंबर, 28 ऑक्टोबर 2022 याप्रमाणे आहे. माहूर येथे 31 मे, 29 जुन, 29 जुलै, 29 ऑगस्ट, 29 सप्टेंबर, 31 ऑक्टोंबर 2022 रोजी आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...