Tuesday, December 28, 2021

नांदेड जिल्ह्यात 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 468 अहवालापैकी एकही कोरोना बाधित आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 545 एवढी आहे. यातील 87 हजार 871 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 19 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.   

आज 19 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 12 व खाजगी रुग्णालयातील 5 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 94 हजार 636

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 90 हजार 546

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 545

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 871

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-19

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 


 अतिरिक्त मालाची वाहतूक केल्यास  

तडजोड शुल्क आकारण्यास मान्यता 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या परवानाधारकांवर विभागीय कारवाईबाबत राज्य परिवहन प्राधिकरणाने पारीत केलेला ठराव रद्द करण्यास व केवळ महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेले तडजोड शुल्क आकारण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000

 अर्धापूर नगरपंचायत आरक्षण

अंतिम अधिसूचना प्रसिद्ध 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- अर्धापूर नगरपंचायतच्या सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या जागा राखून ठेवून ते प्रभाग निर्दीष्ट केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 पोटकलम (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत आदेश निर्गमीत केले आहेत. 

मूलत: नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत. निवडावयाच्या 4 सभासदांच्या संख्येपैकी सर्वसाधारण स्त्रियांसाठी 2 तर अनारक्षितसाठी 2 जागा आहेत. अनुसूची प्रमाणे आरक्षण स्थिती प्रभाग क्र. 1 व 9 सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्र. 7 व 16 सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण स्थिती आहे.

000000

सुधारित वृत्त -

नाळेश्‍वर-सुगाव-हस्‍सापुर-नांदेड रस्त्यावरील

वाहतुकीस 29 एप्रिल पर्यंत प्रतिबंध


नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्‍य मार्ग 61 नाळेश्‍वर सुगाव हस्‍सापुर नांदेड रस्‍त्‍यावरील प्रमुख जिल्‍हा मार्ग- 84 किमी 0/400 येथील काम सुरु करण्यात येणार आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्‍या वाहतुकीस दिनांक 29 एप्रिल 2022 पर्यंत प्रतिबंध केले आहे. या रस्त्यावरील वाहनास पर्यायी मार्ग म्हणून जड वाहनांसाठी पश्चिम वळन रस्‍ता श्री खंडेराव होळकर चौक येथून असर्जन मार्गे नांदेड व नाळेश्‍वर कडे ये-जा करतील. तर दुचाकी, हलके वाहनांसाठी ग्रामीण मार्ग-70  वरुन नोबेल कॉलनी मार्गे नांदेड व नाळेश्‍वर कडे ये-जा करतील. मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत अधिसूचना निर्गमीत केली आहे.

000000

 

जुन्या खाजगी वाहनांची पुर्ननोंदणी आवश्यक 

·         प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनाची तपासणी 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कर न भरता वाहन रस्त्यावर तपासणीमध्ये आढळून आल्यास वाहन परिवहन कार्यालयात अटकावून ठेवण्यात येणार आहे. ज्या खाजगी वाहनांची नोंदणी संपली आहे (15 वर्ष पूर्ण झाली) आहेत, अशा वाहनांची त्वरीत पुर्ननोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, एमआयडीसी, सिडको, नांदेड येथे करावी. येत्या 1 जानेवारी 2022 पासून जिल्हयातील 16 तालुक्यांमध्ये व्यापक प्रमाणात वाहन तपासणीची मोहिम राबविण्यात येणार आहे. थकित कर असलेल्या जिल्ह्यातील वाहनांची यादी मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आली असून त्यांना रस्त्यावरील वाहन तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. याची सर्व वाहन चालक-मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हयातील एकूण 4 हजार 59 वाहन मालकांकडे रुपये 11 कोटी 53 लाख वाहन कर थकीत आहे. तसेच जुन्या दुचाकी, कार, बस मालवाहू वाहनांकडून पर्यावरण कर रु. 5 कोटी 67 लाख थकित आहे. सर्व वाहन मालकांना या कार्यालयाने थकित कर व पर्यावरण कर त्वरीत भरण्याच्या नोटीस पाठविल्या आहेत. तरी संबंधित वाहन मालकांनी आपल्या वाहनाचा थकित कर/पर्यावरण कर परिवहन विभागाच्या parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 7 दिवसात भरावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 11 जानेवारीच्या ऐतिहासिक सामूहिक राष्ट्रगानसाठी

जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी

 ·         नवा विक्रम करण्याचा संकल्प 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या 11 जानेवारी रोजी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सकाळी 11 वाजून 11 मिनीटांनी आयोजित केलेल्या ऐतिहासिक राष्ट्रगानासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय प्रमुख, तालुका पातळीवरील सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.  

नांदेड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थाचे विद्यार्थी, नागरिक हे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अभिवादन करण्यासाठी या राष्ट्रगीत व देशभक्ती गगीत असलेल्या राष्ट्रगान कार्यक्रमात   मोठया संख्येने उर्त्स्फुत सहभाग घेतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. हा उपक्रम केवळ शासकीय आहे असे नव्हे तर यात अधिकाधिक स्थानिक नागरिक यांच्या लोकसहभागाला विशेष आमंत्रित म्हणून सहभागी केले जात आहे. सर्व विभाग प्रमूख आपआपल्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तीचा यात सन्मानाने सहभाग घेतील तसे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी विभाग प्रमुखांना दिले. अत्यंत आगळा व वैशिष्टपूर्ण असलेला हा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाईल असे ते म्हणाले. 

मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर

दिनांक 11 जानेवारी रोजी 11.11 मिनिटाला राष्ट्रगानाचा मुख्य कार्यक्रम नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केला आहे. या समारंभास विशेष निमंत्रित व उर्त्स्फुत सहभाग घेणारे नागरिक, निमंत्रित शालेय विद्यार्थी उपस्थित असतील. याबरोबर पोलीस दलातील परेड पथक, स्काऊट, एनसीसी व नेहरु युवा केंद्राशी संबंधित युवकाचा समावेश राहील. 

शासनाच्या प्रत्येक कार्यालयासमोर होईल राष्ट्रगान 

नांदेड येथील प्रत्येक विभागाच्या जिल्हा कार्यालयासह वाडी, वस्ती, तांड्यावरील ग्रामपंचायतीपर्यंत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर उभे राहून 11 जानेवारी रोजी दिलेल्या वेळेत राष्ट्रगान सादर करतील. प्रत्येक कार्यालयाच्या ठिकाणी उर्त्स्फूत सहभाग होवू इच्छिणाऱ्या नागरिकांचे ते-ते कार्यालय प्रमूख सन्मानाने नोंद घेवून त्यांचा सहभाग घेतील. 

जिल्ह्यातील सर्व शाळा घेणार उर्त्स्फूत सहभाग 

नांदेड जिल्ह्यातील भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला केले जाणारे हे अभिनव अभिवादन असेल असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हा परिषद, सामाजिक न्याय व इतर शासकीय उपक्रमा अंतर्गत असलेल्या सर्व शाळा, विद्यालयाचे विद्यार्थी यात उर्त्स्फुत सहभाग घेणार आहेत. याचबरोबर खाजगी संस्थाही मोठया हिरीरीने पुढाकार घेत असून त्यांचा सहभाग ही याच उपक्रमाचा एक भाग राहील. प्रत्येक तालुका पातळीवर पंचायत समिती, शिक्षण विभाग यात पुढाकार घेवून 11 जानेवारी रोजी 11 वाजून 11 मिनीटांना सादर केल्या जाणाऱ्या राष्ट्रगानात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...