जुन्या खाजगी वाहनांची पुर्ननोंदणी आवश्यक
· प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनाची तपासणी
नांदेड (जिमाका) दि. 28 :- कर न भरता वाहन रस्त्यावर तपासणीमध्ये आढळून आल्यास वाहन परिवहन कार्यालयात अटकावून ठेवण्यात येणार आहे. ज्या खाजगी वाहनांची नोंदणी संपली आहे (15 वर्ष पूर्ण झाली) आहेत, अशा वाहनांची त्वरीत पुर्ननोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, एमआयडीसी, सिडको, नांदेड येथे करावी. येत्या 1 जानेवारी 2022 पासून जिल्हयातील 16 तालुक्यांमध्ये व्यापक प्रमाणात वाहन तपासणीची मोहिम राबविण्यात येणार आहे. थकित कर असलेल्या जिल्ह्यातील वाहनांची यादी मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आली असून त्यांना रस्त्यावरील वाहन तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. याची सर्व वाहन चालक-मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हयातील एकूण 4 हजार 59 वाहन मालकांकडे
रुपये 11 कोटी 53 लाख वाहन कर थकीत
आहे. तसेच जुन्या दुचाकी, कार, बस
मालवाहू वाहनांकडून पर्यावरण कर रु. 5 कोटी 67 लाख थकित आहे. सर्व वाहन मालकांना या कार्यालयाने थकित कर व पर्यावरण कर
त्वरीत भरण्याच्या नोटीस पाठविल्या आहेत. तरी संबंधित वाहन मालकांनी आपल्या
वाहनाचा थकित कर/पर्यावरण कर परिवहन विभागाच्या parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 7 दिवसात भरावा
असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment