Saturday, February 12, 2022

 नांदेड जिल्ह्यात 32 व्यक्ती कोरोना बाधित

तर 80 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 205 अहवालापैकी 32 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 516 एवढी झाली असून यातील 99 हजार 633 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 195 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 रोजी परभणी जिल्ह्यातील पालम येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी  रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 24, नांदेड ग्रामीण 1, भोकर 1, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, किनवट 3, लोहा 1, मुखेड 4, हिंगोली 1, परभणी 1, यवतमाळ 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, किनवट 1 असे एकुण 32 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 40,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 30, खाजगी रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2 असे एकुण 80 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 16, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 98, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 65, खाजगी रुग्णालय 16 असे एकुण 195 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 61 हजार 696

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 42 हजार 456

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 516

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 633

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 688

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.28 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-03

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-24

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-195

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5.

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...