Saturday, June 1, 2019


तूर व चणा अनुदानासाठी आवाहन

नांदेड दि. 1 :- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2017-18 हमी भावाने तूर व चणा अनुदानापोटी आधार लिंक / मापिंग अभावी शेतकऱ्यांना तूर व चणा अनुदान प्राप्त होत नसल्यामुळे सदरील शेतकऱ्यांची यादी संबंधीत सब-एजंट संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी वरील बाबींची पूर्तता करण्यात यावी. त्यामुळे तूर व चणा अनुदान शेतकऱ्यांचे खात्यात जमा होईल, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 
खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

नांदेड दि. 1 :- शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जुलै, 2019 अशी आहे.
राज्यात खरीप हंगाम 2019 मध्ये सदरची योजना खाली नमुद केलेल्या विमा कंपनीकडून संबंधीत जिल्हा समुह क्षेत्रामध्ये राबविण्यात येईल.
जिल्हा समुह क्र.
समाविष्ट जिल्हे
विमा कंपनीचे नाव व पत्ता
1
उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोदिया, चंद्रपुर
एग्रीकल्चर इंश्योरंस कम्पनी ऑफ इंडिया लिमिटेड
मुंबई क्षेत्रीय  कार्यालय: स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वी मंजिल, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई  400023
फोन : 022-61710901, 902,903 , टेली फॅक्स : 61710915
टोल फ्री  क्र 1800 116515
ई-मेल:r0.mumbai@aicofindia.com.     
Web  : www.aicofindia.com
2
ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, गडचिरोली
3
पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बीड
4
रत्नागीरी, नंदुरबार, जळगाव, कोल्हापुर, लातुर
5
जालना, हिगोली,  नागपुर
बजाज अलियान्झ जनरल इंशुरंस कं. लि.
कॉमरझोन, 1 ला मजला, टॉवर 1 , समर्थ अशोक मार्ग, येरवडा पुणे -411006
दुरध्वनी क्र 02066240137, टोल फ्री क्र 18002095959
6
अहमदनगर, परभणी, वाशिम
एग्रीकल्चर इंश्योरंस कम्पनी ऑफ इंडिया लिमिटेड
मुंबई क्षेत्रीय  कार्यालय: स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वी मंजिल, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई  400023
फोन : 022-61710901,, 902,903 , टेली फॅक्स : 61710915
टोल फ्री  क्र 1800 116515
ई-मेल : r0.mumbai@aicofindia.com.
Web   : www.aicofindia.com
7
औरंगाबाद, बुलडाणा, अमरावती
8
धुळे, सोलापुर, सांगली,अकोला, यवतमाळ

         योजनेत सहभागी होण्यासाठी  बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या अगोदर ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत  शेतक-यांना सहभागी होता येणार नाही. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, कृषि व पणन यांनी केले आहे.
00000


वर्कशॉप, चैतन्यनगर  परिसरातील 6 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
6 हजार 700 रुपयाचा दंड आकारला  
नांदेड दि. 1 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील वर्कशॉप  व चैतन्यनगर  परिसरात आज अचानक धाडी टाकून कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फत 6 तंबाखू विक्रेत्यांकडून 6 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच चैतन्यनगर येथील मे ओम पानशॉप येथे ३ हजार २० रुपयेचा गुटखा व पानमसाला प्रतिबंधित अन्न पदर्थाचा साठा आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. 
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तथा ,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नेहरकर  तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे आदी होते.
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
000000


परिवहन कार्यालयाच्या अनुज्ञप्तीसाठी
टँबवर ऑनलाईन परीक्षा
नांदेड दि. 1 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्यावतीने दरमहा शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबिरे आयोजित करण्यात येतात. यात 1 जून 2019 पासून होणाऱ्या मासिक शिबिरामध्ये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जदाराची संगणकीय टॅबवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 
0000



 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 1 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 3 जून 2019 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...