Saturday, August 17, 2019


राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे
सदस्य आचार्य थल्लोजु यांचा दौरा  
नांदेड, दि. 17 :- सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य आचार्य थल्लोजु हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 19 ऑगस्ट 2019 रोजी हैद्राबाद येथून वाहनाने 9 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष डॉ. भगवान लाल सहानी यांचेसोबत नांदेड येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायं 5 वा. नांदेड येथून वाहनाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
0000


समाज प्रबोधनात माध्यमाचे महत्वाचे योगदान
 -  राज्यमंत्री अर्जून खोतकर
नांदेड, दि. 17 :- सामान्य नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचविण्यात व समाज प्रबोधानात माध्यमाचे महत्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी केले. 
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला आजपासून नांदेड येथील स्व. रामेश्वरजी बियाणीनगरी भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. खोतकर बोलत होते. यावेळी रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार तथा इंग्रजी दै. द हिंदूच्या ग्रामीण विभागाचे माजी संपादक पी. साईनाथ यांच्या हस्ते राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर दिक्षा धबाले, आमदार राम पाटील-रातोळीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख, झी-न्युज मुंबई कार्यकारी संपादक प्रसाद काथे, मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
राज्य शासनाच्यावतीने अधिवेशनला शुभेच्छा देऊन राज्यमत्री श्री. खोतकर पुढे म्हणाले की, पत्रकारांची लेखनीत मोठे बळ असून ही शक्ती कमी होऊ देऊ नका. समाजातील प्रत्येक घटकांना माध्यमाप्रती आदराची भावना आहे ती केवळ आपल्या लेखनीतून निर्माण झाली आहे. लेखणीमुळे समाजातील प्रत्येक स्तरात पत्रकारांविषयी सन्मान निश्चितपणे पहायला मिळतो. सामान्य नागरिक प्रश्न पत्रकारांकडून सुटतील अशी अपेक्षा ठेवून असतो, ही जबाबदारी आपल्यावर आहे. विविध क्षेत्रात विषयाचे तज्ज्ञ म्हणून पत्रकारांकडून भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो असाच कायम राहिला पाहिजे. त्यामुळेच लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. त्यामुळे पत्रकारांनी विविध चळवळीत भाग घेतला पाहिजे. अधिवेशनात पत्रकारांच्या हक्काच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा व्हावी. राज्य शासन पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून अधिवेशात घेतलेले ठरावातील बाबींचा पाठपुरावा शासन स्तरावरुन केला जाईल, असे स्पष्ट करुन पत्रकारांचा आवाज समाजात ऐकला जातो, सामान्याचे सर्व प्रश्न शासनापर्यंत पोहचविले जातात. निश्चितपणे शासन हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माध्यमांनी बातमी करतांना सर्व बाबींचा विचार करुन सत्यता पडताळून लिखाण करावे, असे आवाहन श्री. खोतकर यांनी शेवटी केले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार डी. पी. सांवत, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील, कार्यकारी संपादक प्रसाद काथे, माजी संपादक पी. साईनाथ यांनी मनोगत व्यक्त करुन राष्ट्रीय अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या. 
या अधिवेशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जोशी यांनी केले तर आभार प्रदिप नागापूरकर यांनी मानले. जिल्ह्यात तसेच विविध ठिकाणाहून राज्यातील पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.  
0000



अल्पसंख्याक उमेदवारांसाठी
पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण
नांदेड, दि. 17 :- "पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत" राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकडून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत असून यासंदर्भात निवड चाचणीसाठी सोमवार 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राऊंड नांदेड येथे अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती, दोन पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसल्याचा पुरावा. उमेदवार अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या समाजातील असावा. उमेदवार हा 18 ते 28 या वयोगटातील असावा. उमेदवारांची उंची पुरुष 165 से.मी. व महिला 155 से.मी., छाती पुरुष 79 सेमी. फुगगवून 84 से.मी. असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
प्रशिक्षणाचे स्वरुप : निवडलेल्या उमेदवारांना एकुण दोन महिने (50 दिवस) प्रशिक्षण दिले जाईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणा दरम्यान 1 हजार 500 रुपये प्रतीमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. मैदानी प्रशिक्षणानंतर संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार, गणवेश साहित्यासाठी गणवेश, बुट, मोजे, बनियन आदीसाठी 1 हजार रुपये एवढी एकरकमी अनुदान देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000



अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम नियमन 2011
गुटखा, पानमसाला तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई
नांदेड दि. 17 :- अन्न औषध प्रशासन .राज्य, नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी नुकतेच शेख जैनुल पि.शेख गफार, रा. मोमीनपुरा, माहूर यांचे आलु-कांद्याचे दुकान, मांडवी रोड सारखणी ता.किनवट येथून शेख जैनुल पि.शेख गफार या व्यक्तीच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु इत्यादींचा 43 हजार 908 रुपयाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधिताविरुध्द पोलीस स्टेशन सिंदखेड ता. माहूर येथे अन्न सुरक्षा कायदा भा..वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच सिंदखेड येथील पोलीसांनी विजय दशरथ राठोड रा.मलकागुडा तांडा ता.माहूर या व्यक्तीच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु इत्यादींचा रुपये 19 हजार 270 रुपयांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी संबंधिताविरुध्द पोलीस स्टेशन, सिंदखेड ता.माहूर येथे अन्न सुरक्षा कायदा भा..वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु.चं.बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायीकाविरुध्द यापुढे नियमित कार्यवाही घेण्यात येणार असून सदर अन्नपदार्थ कोणीही छुप्या, चोरटया पध्दतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन नांदेड अन्न औषध प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.
प्रतिबंधीत अन्नपदार्थाचे संदर्भात या प्रकरणात अन्नसुरक्षा मानदे कायद्याअंतर्गत कमीतकमी सहावर्षाची कारावास पाच लाख रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतुद आहे, अशी माहिती तु. च. बोराळकर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नांदेड यांनी दिली आहे.  
00000


"सदभावना दिवस", "सामाजिक ऐक्य पंधरवडा"
साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश
नांदेड दि. 17 :- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा "सदभावना दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2019 या कालावधीत "सामाजिक ऐक्य पंधरवडा" साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
सदभावना दिवस व सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, जिल्हा परिषद नांदेड , मनपा नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, विभागीय शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण, समाज कल्याण, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र या कार्यालयांनी अल्पसंख्याक विकास विभागाच्या 11 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन परिपत्रकातील सुचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रम साजरा करुन कार्यवाहीचा अहवाल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
हा पंधरवाडा साजरा करण्यामागे राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सौहार्द भाव वृद्धीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दीष्टे आहेत.
00000


®Ö×¾Ö®Ö ¾ÖÖÆü®ÖÖÓ®ÖÖ एचएसआरपी ®ÖÓ²Ö¸ü ¯»Öê™ü ²ÖÃÖ×¾ÖÞµÖÖचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- ®ÖÖÓ¤êü›ü וֻÆüµÖÖŸÖᯙ ÃÖ¾ÖÔ ¾ÖÖÆü®Ö ¬ÖÖ¸üÛú/“ÖÖ»ÖÛú µÖÖÓ®ÖÖ Ûúôû×¾ÖÞµÖÖŸÖ µÖêŸÖê Ûúß, ¸üßÖê ¾ÖÖÆüŸÖæÛú ´ÖÆüÖ´ÖÖÝÖÔ ´ÖÓ¡ÖÖ»ÖµÖ µÖÖÓ“Öê פü.04.12.2018 ¾Ö פü.06.12.2018 †®¾ÖµÖê פü.01.04.2019 ¯ÖÖÃÖæ®Ö ®Ö×¾Ö®Ö ˆŸ¯ÖÖ¤üßŸÖ ÆüÖêÞÖÖ·µÖÖ ¾ÖÖÆü®ÖÖÓ®ÖÖ HSRP ®ÖÓ²Ö¸ü ¯»Öê™ü ²ÖÃÖ×¾ÖÞµÖÖ²ÖÖ²ÖŸÖ †×¬ÖÃÖæ“Ö®ÖÖ •ÖÖ¸üß Ûú¸üÞµÖÖŸÖ †Ö»Öß †ÖÆêü. ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü פü. 01.04.2019 ®ÖÓŸÖ¸ü ˆŸ¯ÖÖפüŸÖ ÆüÖêÞÖÖ·µÖÖ ¾ÖÖÆü®ÖÖÓ®ÖÖ Ûëú¦üßµÖ ´ÖÖê™üÖ¸ü ¾ÖÖÆü®Ö ×®ÖµÖ´Ö, 1989 “µÖÖ ×®ÖµÖ´Ö 50 ®ÖãÃÖÖ¸ü HSRP ®ÖÓ²Ö¸ü ¯»Öê™ü ²ÖÃÖ×¾ÖÞÖê ²ÖÓ¬Ö®ÖÛúÖ¸üÛú †ÖÆêü.
®Ö×¾Ö®Ö ¾ÖÖÆü®Ö ÜÖ¸êü¤üß Ûú¸üŸÖÖ®ÖÖ ÃÖ¾ÖÔ ¾ÖÖÆü®Ö ´ÖÖ»ÖÛúÖÓ®Öß HSRP ®ÖÓ²Ö¸ü ¯»Öê™ü »ÖÖ¾Ö»Öß †ÃÖ»µÖÖ“Öß ÜÖÖ¡Öß Ûú¹ý®Ö“Ö ¾ÖÖÆü®Ö ŸÖÖ²µÖÖŸÖ ªÖ¾Öê. ŸÖÃÖê“Ö ¾ÖÖÆü®Ö ×¾ÖŸÖ¸üÛúÖÓ®Öß ×¤ü.01.04.2019 ®ÖÓŸÖ¸ü ˆŸ¯ÖÖ¤üßŸÖ —ÖÖ»Ö껵ÖÖ ¾ÖÖÆü®ÖÖÓ®ÖÖ HSRP ®ÖÓ²Ö¸ü ¯»Öê™ü ²ÖÃÖ¾Öæ®Ö“Ö ¾ÖÖÆü®Ö ×¾ÖŸÖ¸üßŸÖ Ûú¸üÖ¾Öê. †®µÖ£ÖÖ ÃÖ¤ü¸ü ×¾ÖŸÖ¸üÛúÖÓ¾Ö¸ü ×®ÖµÖ´ÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ÛúÖ¸ü¾ÖÖ‡Ô Ûú¸üÞµÖÖŸÖ µÖê‡Ô»Ö µÖÖ“Öß ®ÖÖë¤ü ‘µÖÖ¾Öß, असे आवाहन   ¿Öî»Öê¿Ö ÛúÖ´ÖŸÖ  ¯ÖÏÖ¤êü׿ÖÛú ¯Ö׸ü¾ÖÆü®Ö †×¬ÖÛúÖ¸üß, ®ÖÖÓ¤êü›ü यांनी केले आहे.
00000


मतदारात यादी नाव नोंदणीचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम –दुसरा सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड तालुक्यातील 86 नांदेड उत्तर व 87 नांदेड दक्षिण मतदारसंघात मतदार यादी दुरुस्‍तीसाठी भारत निवडणूक आयोग यांनी पुढील प्रमाणे सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. 
पुनरिक्षणाचे टप्‍पे
कालावधी
दावे व हरकती निकालात काढणे
शनिवार 24 ऑगस्ट 2019 पर्यंत
उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी /जिल्‍हा निवडणूक अधिकारी/मतदार यादी निरिक्षक/मुख्‍यनिवडणूक अधिकारी यांचेव्‍दारा मतदार यादीची विशेष तपासणी करणे
मंगळवार 27 ऑगस्ट 2019 पर्यंत
मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी
शनिवार 31ऑगस्ट 2019 (
भारत निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यास दिलेल्‍या मूदत वाढीबाबत नांदेड तालुक्‍यातील मतदारांना शेवटीची संधी देण्यात येत असून, शनिवार 24 ऑगस्‍ट 2019 या कालावधीत मतदारांनी फॉर्म नं. 6, 7, 8, व 8अ तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा मनपा नोडल अधिकारी यांच्याकडे जमा करावेत तसेच सर्व मतदारांनी सुधारीत कार्यक्रमाची नोंद घेवून राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे. 
00000


सामाजिक न्याय राज्यमंत्री
अविनाश महातेकर यांचा दौरा
नांदेड, दि. 17 :-  राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
            रविवार 18 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई येथून विमानाने सायं 5.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने नांदेड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.सायं. 5.35 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं 5.45 वा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांचेशी चर्चा. स्थळ शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 6 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने गंगाखेड मार्गे परळीकडे प्रयाण करतील.
00000

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष
डॉ. भगवान लाल सहानी यांचा दौरा
नांदेड, दि. 17 :- भारत सरकार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष डॉ. भगवान लाल सहानी हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी मनमाड येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.45 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 6 ते 9.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सकाळी 10 वा. श्री गुरुद्वारा दर्शनासाठी राखीव. सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत कुसूम सभागृहातील बैठकीत नागरिकांशी संवाद साधतील. दुपारी 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायं 4 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं 5.35 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.
00000
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांचा दौरा
नांदेड, दि. 17 :-  केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 18 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई विमानतळ येथून सायं 5.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं. 5.30 वा. नांदेड येथून वाहनाने परळी जि. बीडकडे प्रयाण करतील.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...