Tuesday, February 2, 2021

 अनुकंपा नियुक्ती प्रकरणाबाबत तातडीने कार्यवाही व्हावी

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्तीसाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार जी काही पदे उपलब्ध आहेत त्याबाबत नियमात बसणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.
अनुकंपा नियुक्तीीबाबत आज त्यांच्या अध्यढक्षतेखाली नांदेड जिल्हाकअंतर्गत सर्व नियुक्तीन प्राधिकारी यांची बैठक आयोजीत करण्या्त आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी संबंधित विभाग प्रमुखांना निर्देश दिले. सर्व कार्यालयनिहाय अनुकंपा ज्येष्ठिता याद्या नियमानुसार अद्यावत करुन त्या प्रसिद्ध करण्याबाबतही त्यांनी सांगितले. बैठकीत अनुकंपा नियुक्तीीसाठी उपलब्धा रिक्ता पदे व अनुकंपा नियुक्ती्च्यां अनुषंगाने करण्याीत आलेल्यार कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
00000



 

गोपुरी वर्धा सेवाग्राम खादी कपड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

नांदेड (जिमाका) दि. 2 :- स्वामी प्रत्ययानंद सरस्वती, चिन्मय मिशन नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत    जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज दिवसीय खादी प्रदर्शनाचे उद्घाटन स्वानंद स्वदेशी भांडार, अष्टविनायकनगर, कॅनलरोड, भावसार चोकाजवळ नांदेड येथे संपन्न झाले. याप्रसंगी नायब तहसिलदार सुनील माचेवाड, कॉटन फेडरेशनचे मॅनेजर  संदिप पाटिल हनवते, एपीआय बालाजी गाजेवार  यांची  याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. 

यावेळी राजेंद्र देवणीकर यांनी खादी व ग्रामोद्योग याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. स्वानंद स्वदेशी भांडाराकडून विविध पर्यावरण स्नेही नैसर्गिक कृषिपूरक स्वावलंबी ग्रामोद्योगाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबवले जातात. नैसर्गिक विषमुक्त धान्य,  भाजीपाला, लाकडी घाण्याचे तेल, मातीच्या श्रीगणपतीच्या मूर्ती आणि देशभरातील खादी व हातमाग यांनी तयार केलेली सुती कपडे यांचे प्रदर्शन व प्रचार चालू असतो. ग्रामउद्योगात तयार झालेल्या वस्तू कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला चालना देतात. या माध्यमातून गावातला पैसा गावात राहतो तद्वतच ग्रामस्वावलंबन होण्यास मदत होते. मेक इन इंडिया  म्हणजे खऱ्या अर्थाने ग्राम स्वावलंबन होय.  

याप्रसंगी जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन इटनकर यांनी कापसापासून तयार झालेल्या खादी सुती कपड्यांचा व ग्रामोद्योगातील वस्तूंचा प्रसार जिल्ह्यात सर्वदूर होण्याची गरज आहे. तसा प्रचार सर्वांनी केला पाहिजे असे मत व्यक्त केले व प्रशासनाचे सहकार्य मिळेल असे सांगितले. तसेच त्यांनी ग्रामसेवा मंडळ गोपुरीचे व्यवस्थापक व प्रचारक सुरज विठ्ठल करुले, श्रीकृष्णा मेहेर, अतुल काकडे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धाचा खादी कपडा हा चांगल्या दर्जाचा असून उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात गरम व उबदार राहतो, असे सांगितले. पुरुष व महिलासाठी खादी ड्रेस मटेरियल, खादीच्या साडया व खादी बेडशिट उपलब्ध असून नांदेड वाशियांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  ग्रामसेवा मंडळ गोपुरीचे व्यवस्थापक व प्रचारक सुरज विठ्ठल करुले यांनी केले. 

याप्रसंगी अॅड. उदय संगारेड्डीकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व  राजेन्द्र देवणीकर यांनी आभार मानले. या प्रदर्शन उद्घाटनाच्या कार्यक्रमास  श्रीमती सुधा देशपांडे, सौ. निर्मला खडतकर, श्रीमती विद्या उजळंबे, सौ. मीरा देवणीकर,  राजेंद्र उदगीरकर, शरणाप्पा बिराजदार,  संतोष देवणीकर,  दिलीप कासार,  बालाजी सरसे, कामाजी पाटील मरळकर यांची उपस्थिती होती.

0000



 

14 कोरोना बाधितांची भर   

25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- मंगळवार 2 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 14  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 3 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 567 अहवालापैकी 550 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 577 एवढी झाली असून यातील 21 हजार 475 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 312 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 586 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 17, गोकुंदा कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.11 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, हिमायतनगर तालुक्यात 1 असे एकुण 11 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 1, किनवट तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1  असे एकूण 3 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 312 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 9, मुखेड कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 3, महसूल कोविड केअर सेंटर 14, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 186, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 40, खाजगी रुग्णालय 11 आहेत.   

मंगळवार 2 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 90 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 12 हजार 421

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 85 हजार 514

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 577

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 475

एकुण मृत्यू संख्या-586

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.11 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-402

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-312

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.          

0000

 

पेन्शन अदालतीचे आयोजन करण्याचे निर्देश

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत पेन्शन अदालतीचे आयोजन करावे. तसेच याबाबत सर्व विभाग / कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.   

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक विभागीय आयुक्त व इतर विभागाचे विभाग प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत पेन्शन अदालतचे आयोजन / प्रयोजन करावे. तसेच स्थानिक वृत्तपत्रात पेन्शन अदालत म्हणून या कार्यक्रमास प्रसिद्धी देण्यात यावी, असे शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित केले आहेत.   

सेवानिवृत्त वेतनविषयक प्रलंबित प्रकरणे व पेन्शन अदालत मधील पेन्शन तक्रारी / निवेदन हातळण्यासाठी कार्यालयातील एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. त्यांचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल देण्यात यावे. जेणेकरुन त्या-त्या विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आपल्या सेवानिवृत्ती वेतन विषयक प्रलंबित प्रकरणांच्या तक्रारींचा / निवेदनांचा तपशील पेन्शन अदालतमध्ये मांडू शकतील. नोडल अधिकारी नियुक्त आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास दयावी. सर्व विभाग / कार्यालय प्रमुखांनी याप्रमाणे आयोजन / प्रयोजन करुन सेवानिवृत्त वेतनविषयक प्रलंबित प्रकरणांचा व प्रत्येक अदालतमध्ये महिनाअखेर आलेल्या तक्रारी / निवेदन व त्या निवारण्याकरीता करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेस निश्चितपणे पोहोचेल अशारितीने जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय अधिकारी तहसिलदार (सर्वसाधारण) यांचेकडे पाठवावेत. सर्व विभाग / कार्यालय प्रमुख यांनी परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

00000

 

सुदृढ नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करावे

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोवीड-19 प्रादुर्भावमुळे वैद्यकीय यंत्रणेला रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक भान ठेवून सुदृढ नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. "32 रस्ता सुरक्षा अभियान 2021" निमित्ताने नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे अपघाताच्यावेळी करावयाच्या प्रथमोपचाराचे प्रात्याक्षिक मार्गदर्शन शिबीराचे आज आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 

रस्ते अपघात त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्याहेतूने "32 रस्ता सुरक्षा अभियान 2021" नांदेड  जिल्हयातील 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. यानिमित्त आयोजित चित्रकला निबंध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी यावेळी केले. 

या आरोग्य तपासणी शिबीराकार्यालयात आलेल्या अर्जदारांची तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी, रक्तदाब, मधूमेह एचआयव्ही तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबीरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील डॉ. पुजा नागरगोजे, डॉ. निशा गवरवार, डॉ. शरद अवचार,डॉ. भोंग, श्री. भालेराव यांच्या वैद्यकीय पथकाने सहभाग घेतला. श्री गुरुगोबिंदसिंसामान्य रुग्णालयाच्या डॉ. उमेश मुंडे, डॉ. शिंदे, श्रीमती शिल्पा सोनाळे, श्री. सुवर्णकार यांनी आरोग्य तपासणी केली. तसेच श्री. शेख यांनी नेत्र तपासणीसाठी सहकार्य केले. सहभागी नागरिकांच्या एचआयव्ही तपासणीसाठी डॉ. कुलदीप अंकुशे, डॉ. पंडागळे, श्री. र्यवंशी यांनी परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, राहूल जाधव, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, मोल आव्हाड, मुख्य लिपीक राजेश गाजूलवाड, वरिष्ठ लिपीक श्रीमती जयश्री वाघमारे, नंदकिशोर कुंडगीर प्रदिप बिदरकर यांच्यासह नांदेड येथील मोटार ड्रायव्हींग स्कूल संचालक यांनी परिश्रम घेतले.

0000







  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...