Thursday, October 17, 2019


मतदानाच्‍या एक दिवसापूर्वी मतदानाच्‍या दिवसी प्रिंट मिडीयामध्‍ये
                 राजकिय जाहिरात देण्‍यासाठी जाहिरातीचे प्रमाणिकरण करणे आवश्‍यक

नांदेड, दि.17:- विधानसभा सार्वत्रिक निवडूक 2019 साठी सोमवार दिनांक 21 ऑक्‍टोबर 2019 रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. मतदानाच्‍या एक दिवसापूर्वी म्‍हणजे 20 ऑक्‍टोबर रोजी मतदानाच्‍या दिवसी म्‍हणजे 21 ऑक्‍टोबर रोजी वृत्‍तपत्रात राजकीय जाहिरात प्रकाशीत करावयाची असल्‍यास त्‍याचे माध्‍यम प्रमाणीकरन संनियत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक असल्‍याचे भारत निवडणूक आयोगाने म्‍हटले आहे. त्‍यानुसार मतदानाच्‍या एक दिवस आगोदर मतदानाच्‍या दिवशी राज्‍यकीय जाहिरात वृत्‍तपत्रात प्रकाशीत करण्‍यापूर्वी माध्‍यम प्रमाणीकरण संनियंत्रण समितीची मान्‍यता घ्‍यावी अशी माहिती जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.प्रिंट मिडीयात कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणत्याही संस्था व्यक्तींना जाहिरात प्रकाशीत करावयाची असल्‍यास जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
0000



वृत्तपत्रांनी व इतर प्रसार माध्यमानी
एमसीएमसी समितीकडून प्रमाणित केलेल्याच जाहिराती प्रसारित कराव्यात

नांदेड दि. 17 :- मतदानाच्या दिवशी आणि अगोदरच्या दिवशी म्हणजेच  रविवार, दि. 20 ऑक्टोबर, 2019 व दि. 21 ऑक्टोबर, 2019 वृत्तपत्रातील जाहिराती पूर्व प्रमाणिक केलेल्याच असाव्यात. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतदान दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या प्राचारपर जाहिरातीची पूर्व प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन आणि जाहिरातीच्या माध्यमातून चुकीच्या दृष्टीने फसवणूक करणाऱ्या मतदानाच्या हक्कासाठी प्रलोभित जाहिरातीतून उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या हितासाठी प्रभावित करणाऱ्या जाहिरात नसाव्यात कोणतीही अप्रीय घटना किंवा समाजात द्वेष व्यक्त करणाऱ्या जाहिराती प्रसारीत / प्रकाशित करु नयेत. आयोगाच्या संविधान कलम 324 च्या अधीन राहून निर्देश दिले आहेत. राजकीय पक्ष किंवा उम्मेदवार किंवा इतर संस्था किंवा मतदानाच्या दिवशी आणि अगोदरच्या दिवशी कोणीही विनापरवानगी मुद्रीत माध्यमातून प्रचार प्रकाशित करु नयेत. दिनांक 20 व 21 ऑक्टोबर, 2019 रोजी प्रकाशित होणाऱ्या जाहिराती माध्यम प्रमाणिकरण संनियंत्रण समितीमार्फत प्रमाणित केलेल्याच प्रकाशित करण्यात यावेत, अशी सुचना जिल्हाधिकारी यांनी केली.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...