Wednesday, July 17, 2019


बांधकाम कामगारांना 
नोंदणी करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 17 :- राज्य शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करणे व त्यांना सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी असे, आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.
मंडळाने नोंदणीसाठी निश्चित केलेले शुल्क 37 रुपये व त्यापुढील वर्षाच्या नुतनीकरणासाठी वार्षिक 12 रुपये इतके शुल्क भरणा करावे. याव्यतिरिक्त कोणतेही शुल्क कामगारास लागत नाही. याबरोबर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत सेफ्टी / इसेशियल कीट सुद्धा नि:शुल्क देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत या मंडळाचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड कार्यालयामार्फत चालविण्यात येत आहे. शासन अधिसूचनेद्वारे बांधकामाच्या व्याखेत समावेश करण्यात आलेल्या 21 बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षापासून ते 60 वर्षाच्या आतील कामगारांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी दरवर्षाला माघील 12 महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप केले जाते. या योजनांमध्ये बांधकाम कामगारासह त्याची पत्नी व अपत्यांचा देखील समावेश असून त्यांना प्रसुतीसाठी अर्थसहाय्य, गंभीर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य, कामावर असताना अपघातामुळे अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, कामगारांचे स्वत:चे विवाहासाठी अर्थसहाय्य, कामगारांच्या अपत्यांना पहिली पासून ते पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य आदी विविध योजनाद्वारे अर्थसहाय्य वाटप केले जाते. कामगारांनी खाजगी एजंटापासून सावधान रहावे, असेही आवाहन कामगार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   
00000     

शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज सुरु


नांदेड दि. 17 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 6  वी प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा 11 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून संबंधितांनी www.navodaya.gov.in www.nvsadmissionclasssix.in या वेबसाईटवर वर विनामूल्य ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज करण्याची मुदत 15 सप्टेंबर 2019 पर्यंत देण्यात आली आहे.
जिल्हयातील चालू शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 5 वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या  सर्व शासकीय / निमशासकीय  मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी सलग्न तीन शैक्षणिक वर्ष 2017-18, 2018-19, 2019-2020 मध्ये अनुक्रमे वर्ग तीसरी, चौथी व पाचवी वर्ग खंड न पडता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करतांना विद्यार्थ्यांचा जन्म दिनांक 1 मे 2007 ते 30 एप्रिल 2011 दरम्यान असलेल्या सर्व वर्गवारीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर करता येईल. विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन करताना  विद्यार्थ्याचे छायाचित्र 100 केबीमध्ये व स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी व शाळा मुख्याध्यापकांचे सही व शिक्यासह प्रमाणपत्र स्कॅन कॉपी अपलोड करावे लागेल.  तसेच इयत्ता  5 वी शिक्षण घेत असलेल्या चालू  विद्यार्थ्यांची शाळा  ऑनलाईन अर्ज करतांना पालक शिक्षक व संबंधीत व्यक्तीने काळजीपुर्वक अचुक माहिती घेवून ऑनलाईन अर्ज करावेत. जसे जन्मतारीख, जातीची वर्गवारी व शहरी किंवा ग्रामीण आहे काय ते खात्री करुन अर्ज करावेत. अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 सप्टेंबर 2019  आहे.
ही प्रवेश परिक्षा शनिवार 11 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.30  वा. नांदेड जिल्हयातील संबंधित परिक्षा केंद्रावर घेण्यात येईल.  संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक  व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...