नांदेड दि. 17 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय
विद्यालयातील इयत्ता 6
वी प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा 11 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून
संबंधितांनी www.navodaya.gov.in
व www.nvsadmissionclasssix.in या वेबसाईटवर
वर विनामूल्य ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज करण्याची
मुदत 15 सप्टेंबर 2019 पर्यंत देण्यात
आली आहे.
जिल्हयातील चालू शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 5 वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या
सर्व शासकीय / निमशासकीय
मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी सलग्न तीन शैक्षणिक वर्ष
2017-18, 2018-19, 2019-2020 मध्ये अनुक्रमे वर्ग तीसरी, चौथी व पाचवी वर्ग खंड न पडता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज
करतांना विद्यार्थ्यांचा जन्म दिनांक 1 मे 2007 ते 30 एप्रिल 2011 दरम्यान
असलेल्या सर्व वर्गवारीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर
करता येईल. विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन करताना
विद्यार्थ्याचे छायाचित्र 100 केबीमध्ये व स्वाक्षरी,
पालकांची स्वाक्षरी व शाळा मुख्याध्यापकांचे सही व शिक्यासह
प्रमाणपत्र स्कॅन कॉपी अपलोड करावे लागेल.
तसेच इयत्ता 5 वी शिक्षण घेत असलेल्या चालू विद्यार्थ्यांची
शाळा ऑनलाईन अर्ज करतांना पालक शिक्षक व
संबंधीत व्यक्तीने काळजीपुर्वक अचुक माहिती घेवून ऑनलाईन अर्ज करावेत. जसे जन्मतारीख,
जातीची वर्गवारी व शहरी किंवा ग्रामीण आहे काय ते खात्री करुन अर्ज
करावेत. अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15
सप्टेंबर 2019 आहे.
ही प्रवेश परिक्षा शनिवार 11 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.30
वा. नांदेड जिल्हयातील संबंधित परिक्षा केंद्रावर घेण्यात येईल. संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक
व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे
प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment