Thursday, July 22, 2021

 

जिल्ह्यातील 76 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 76 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

तर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, खडकपुरा या 10 केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शहरी दवाखाणा सांगवी, विनायकनगर, करबला, अरबगल्ली या 4 केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी 80 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, माहूर, बारड, उमरी या 9 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय बिलोली, लोहा, नायगाव या 4 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 37 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 21 जुलै पर्यंत एकुण 7 लाख 58 हजार 218 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 22 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

0000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित, 9 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 310 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजन तपासणीद्वारे 3 असे एकुण 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 147 एवढी झाली असून यातील 87 हजार 431 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 57 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, उमरी तालुक्यांतर्गत 2 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा अंतर्गत 1, मुखेड तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 6 बाधित आढळले.   

आज जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, कंधार तालुक्यांतर्गत 1, मुखेड कोविड रुग्णालय 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 57 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 40, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 140 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 45 हजार 196

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 43 हजार 121

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 147

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 431

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-49

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-57

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

*****


 

आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड येथील जिल्हा रुग्णालय व शंकर विद्यालय नमस्कार चौक येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच  संपन्न झाले.

 

या शिबिरातर्गंत 65 रुग्णांचे उच्च रक्तदाब, मधुमेह, कान-नाक-घसा, मौखिक आरोग्य इत्यादीसाठी तपासणी करण्यात आली. यापैकी 22 रुग्ण हे मधुमेह, 27 रुग्ण उच्च रक्तदाब तसेच 7 रुग्ण हे मधुमेह व उच्च रक्तदाब यांचे उपचार घेत असल्याचे आढळून आले. या आरोग्य तपासणी शिबिरास दंत शल्य चिकित्सक डॉ. कांतीलाल इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. उमेश मुंडे व अधिपरिचारिका प्रियंका झगडे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरासाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव व सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले. 

*****

 

अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा (CET);

ऑनलाईन सुविधा तांत्रिक कारणासाठी तूर्त बंद

·      आवेदन पत्र भरण्यास विद्यार्थांना पुरेसा कालावधी देणार 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- सन 2021-22 च्या  इयत्ता 11 वी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव तूर्त बंद ठेवण्यात आले आहे. ही सुविधा पूर्ववत सुरु झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल. तसेच परीक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. 

सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. 21 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत करण्यात आले आहे. परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी ) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि.20 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 पासून दि. 26 जुलै 2021 अखेर उपलब्ध करुन देण्यात आली होती.

*****

 

कृषि औजारे बँक योजनेसाठी 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत   

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मानव विकास कार्यक्रमांतर्गंत कृषि औजारे बँक योजना ही जिल्ह्यातील हिमायतनगर, देगलूर, किनवट या तालुक्यात कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्मातर्गंत नोंदणीकृत महिला बचतगटांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयात गुरुवार 5ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

मानव विकास कार्यक्रम सन 2020-21 अंतर्गत निवडलेल्या तालुक्यात प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार हिमायतनगर, देगलूर, किनवट तालुक्यामध्ये प्रति तालुका एक औजारे बँक इतके लक्षांक कृषि कार्यालयास प्राप्त झाले आहे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लक्षांकाच्या अधिन राहुन लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पूर्ण करणाऱ्या गटांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा महिला शेतकरी बचतगटांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने केले आहे.

*****

 

गर्भपात औषध अवैध विक्री प्रकरणी गुन्हा नोंद

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- गर्भपाताचे औषध ए-कारे किट यांची अवैधरित्या विक्री केल्या प्रकरणी मे. मेट्रो फार्मा नांदेड या दुकानाचे मालक श्रीमती मालती दिपक भोरगे रजि. फार्मासिस्ट प्रकाश सुदाम लोखंडे व डी.के.टी. इंडीया या कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी बुध्दानंद थोरात, मयुर लोले व मयुर वेलापुरे यांचे विरुध्द भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 2 जुलै 2021 रोजी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मा. ज. निमसे यांनी सहाय्यक आयुक्त औषधे रा. शं. राठोड, सहा आयुक्त औषधे औरंगाबाद संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

 

मे. मेट्रो फार्मा नांदेड या घाऊक औषध विक्री दुकानाची तपासणी केली असताना दुकानदाराने  ए-कारे किट या गर्भपाताचे औषधाची मोठया प्रमाणावर खरेदी विक्री केल्याचे दिसून आले. दुकानदाराने यवतमाळ, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील डॉक्टर व औषध विक्रेत्यांना औषधाचा पुरवठा केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त औषधे यांना डॉक्टराकडे पुढील चौकशी करुन अहवाल देण्याची विनंती करण्यात आली. त्यात मे. मेट्रो फार्मा नांदेड यांनी प्रशासनाला सादर केलेली गर्भपाताच्या औषधाच्या विक्री बिले खोटी व बोगस आढळून आले असून डॉक्टरांना औषधी पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मे. मेट्रो फार्मा नांदेड यांचे  चौकशीत त्यांनी डी.के.टी.इंडीया कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी बुध्दानंद थोरात, मयुर लोले व मयुर वेलापुरे यांचे सांगण्यावरुन औषधी परजिल्ह्यात पाठविल्याचे आढळून आले. मे. मेट्रो फार्माचे मालक श्रीमती मालती दिपक भोरगे व रजि. फार्मासिस्ट प्रकाश सुदाम लोखंडे यांनी डी.के.टी इंडीया कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी बुध्दानंद थोरात, मयुर लोले व मयुर वेलापूरे यांच्याशी संगनमत करुन ए-कारे किट या गर्भपाताचे औषधाची विक्री अवैधरित्या काळया बाजारात गर्भपात करणेसाठी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे विरुध्द भा. दं.वि. कलम 34, 177,336,420,468, 471 व औषधे व सौंदय प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 चे नियम 65 (5), 65(9) () नुसार भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्र. 247/2021 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसामार्फत सुरु आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (औषधे) यांनी दिली आहे.

*****

 97 गावांच्या स्मशानभूमिला खाजगी जमिनीसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद  

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यातील असंख्य गावांना स्वत:ची स्मशानभूमि नसल्याने होणारी मानसिक घालमेल लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: लक्ष घातले आहे. जिल्ह्यात एकुण 306 गावांना स्मशानभूमि नाही. यातील 90 गावांना स्मशानभूमिसाठी शासकिय जमीन नुकतीच प्रदान करण्यात आली. 97 गावांना स्मशानभूमिसाठी शासकिय जमीन उपलब्ध नसल्याने त्या गावात खाजगी जमीन घेण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. हे लक्षात घेऊन या 97 गावांसाठी स्मशानभूमिला जागा घेता यावी यादृष्टिने 5 कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करुन दिल्याचा निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला. 

जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

गाव तेथे स्मशानभूमि या योजनेला अत्यंत भावनिक किनारा असून नागरिकांच्यादृष्टिने तो अत्यंत आस्थेचा विषय आहे. लोकांची स्मशानभूमिसाठी होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी मी प्रयत्नशील असून जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत सर्व प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण होत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. ज्या गावांना यासाठी जमिनी विकत घ्याव्या लागणार आहेत त्या उपलब्ध करुन देणाऱ्या नागरिकांनी याकडे व्यावहारिक दृष्टिने न पाहता गावाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोणातून, गावाप्रती असलेल्या योगदानाच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास जिल्ह्याचा हा प्रश्न तात्काळ सुटू शकेल असा विश्वासही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

या बैठकीत जिल्ह्यातील पांदण रस्त्याबाबतही आढावा घेण्यात आला. या रस्त्याची तीन स्तरात विभागनी करण्यात आली असून मजबुतीकरण, कच्चे काम आणि कच्चे काम व मजबुतीकरण असे ते स्तर आहेत. जिल्हास्तरीय समितीने जे रस्ते सूचविले आहेत त्यापैकी किती रस्ते दर्जोन्नत करता येतील याची पाहणी करुन जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून यादी निश्चित करावी, असेही या बैठकीत ठरले. 

ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी उपलब्ध असलेल्या ज्या-ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेंतर्गत रस्ते विकासाला अगोदर प्राधान्य देऊन ही कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. यात जिल्ह्यातील जे तालुके आदिवासी भागात मोडतात त्या भागातील रस्ते विकासासाठी आदिवासी विभागांतर्गत उपलब्ध असलेला निधी लक्षात घेऊन कामे झाली पाहिजे. जिल्हा विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, 15 वा वित्त आयोग, सार्वजनिक बांधकाम विभाग, डिपीडीसी अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा प्रश्न मार्गी लावू, असेही त्यांनी स्पष्ट केले.




*****

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...