जिल्ह्यातील
नगरपरिषद, नगरपंचायत
निवडणुकीसाठी
विविध बाबींबाबत निर्बंध आदेश
नांदेड
दि. 2 :- राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका
तसेच नगरपरिषद अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार
जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आहे.
जिल्हयातील या निवडणूक
कार्यक्रमाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या
दृष्टीकोनातून शासकीय विश्रामगृह, ध्वनिक्षेपक, मिरवणुका, घोषणा, उपोषण, सभा,
शासकीय वाहन, वाहनावर प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे, सार्वजनिक ठिकाणी पक्ष कार्यालय
स्थापन करणे, मतदान व मतमोजणी केंद्र, सार्वजनिक ठिकाणी पक्षाचे कापडी फलके, भाषण
देणे, नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस कार्यपद्धती, सार्वजनिक मालमत्तेचे विरुपण याविषयी
निर्बंध जारी केले आहेत.
जिल्ह्यातील नगरपरिषद,
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीत व हद्दीच्या बाहेर एक किलो मिटर परिसरात
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार जिल्हादंडाधिकारी सुरेश
काकाणी यांनी हे आदेश काढले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया वगळता
हे आदेश निर्गमीत झाल्यापासून दि. 19 डिसेंबर 2016 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात
राहतील.
विश्रामगृहाच्या
वापरावर नियंत्रण
शासकीय व निवडणूकीच्या
कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस
विश्रामगृहात थांबण्यासाठी संबंधित खात्याने दिलेला अधिकृत परवाना असल्याशिवाय
किंवा सक्षम अधिका-याच्या पूर्व परवानगी शिवाय जिल्ह्यातील होणा-या नगरपरिषद,
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीत व हद्दीच्या बाहेर एक किलो मिटर परिसरात
शासकीय, निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्या परिसरात प्रवेश करता येणार नाही.
ध्वनीक्षेपक, ध्वनिवर्धकाचा
वापर नियमन व नियंत्रण
कोणतीही व्यक्ती, संस्था,
पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर सक्षम
प्रधिका-याच्या पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनांवर ध्वनिक्षेप
व ध्वनिर्धकाचा वापर सुध्दा सक्षम प्राधिका-याच्या पूर्व परवानगी शिवाय करता
येणार नाही. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2013
नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत
राखून करावी. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी आणि रात्री
10 वाजेनंतर करता येणार नाही.
कार्यालये,
विश्रामगृहे इत्यादी परिसरात
मिरवणूका, घोषणा,
उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध
निवडणुकीचे कालावधीत जिल्ह्यातील होणा-या
नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीत व हद्दीच्या बाहेर एक किलो मिटर
परिसरात सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय,
निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, विश्रामगृह याठिकाणी कोणत्याही
प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या
घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक
प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
शासकीय वाहनाच्या
गैरवापरास प्रतिबंध
निवडणुकीचे कालावधीत जिल्ह्यातील
होणा-या नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीत व हद्दीच्या बाहेर एक
किलो मिटर परिसरात कोणत्याही वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त
मोटारगाडया अथवा वाहने (Cars / Vehicles)
वापरण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
उमेदवारांचे
नामनिर्देशनपत्र दाखल करताना
अवलंब करावयाची कार्यपध्दत
निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन मोटारगाड्या, वाहने यांचा ताफ्यात समावेश
असावा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात
पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी
यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात
नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही
प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही
प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
हा आदेश जिल्ह्यातील होणा-या
नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक करिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दिनांक 19 नोव्हेंबर
2016 रोजी सकाळी 11 वाजेपासून दिनांक 25 नोव्हेंबर 2016 दुपारी 3 वाजेपर्यत ( दिनांक 20.11.2016 रविवार वगळून )
पर्यंत अंमलात राहतील.
सार्वजनिक ठिकणी
पक्षांचे चित्रे,
चिन्हांचे कापडी
फलके, भाषणावर निर्बंध
नगरपरिषद, नगरपंचायत
सार्वत्रिक निवडणूक हद्दीत व हद्दीच्या बाहेर एक किलो मिटर परिसरात सार्वजनिक ठिकाणी
पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास
प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
शासकीय,
निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची
विरुपता करण्यास
निर्बंध
निवडणूकीचे कालावधीत शासकीय,
निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता
करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. हे आदेश दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजीच्या
मध्यरात्री पर्यंत अंमलात राहतील.
निवडणूक
प्रचारासाठी वापरण्यात येणा-या वाहनांवर
पक्ष प्रचाराचे
कापडी फलके, झेंडे लावणे इत्यादी बाबीस प्रतिबंध
निवडणूकीचे कालावधीत जिल्ह्यातील
होणा-या नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीत व हद्दीच्या बाहेर एक
किलो मिटर परिसरात निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणा-या वाहनांवर पक्ष प्रचाराचे
कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी पुढील प्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.
फिरत्या वाहनांनवर पक्ष
प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे
राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार
नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या
डाव्या व उजव्या बाजुनेच लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार
नाही. फिरत्या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत
पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहना
व्यतिरीक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी
तात्पुरती पक्षकार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध
निवडणुकीचे कालावधीत जिल्ह्यातील
होणा-या नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीत व हद्दीच्या बाहेर एक
किलो मिटर परिसरात धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक
ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंधीत करण्यात
आले आहे.
मतदान केंद्र,
मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंध
जिल्ह्यातील होणा-या नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
हद्दीत ज्या ठिकाणी रविवार 18 डिसेंबर 2016
रोजी मतदान होणार आहे अशा मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात व सोमवार 19
डिसेंबर 2016 रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200
मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर,
वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स
उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे
प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरीता
प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
हा आदेश जिल्ह्यातील होणा-या
नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र
परिसरात रविवार 18 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यन्त व
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात सोमवार 19 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी
संपेपर्यन्त अंमलात राहील.
00000