Wednesday, November 2, 2016

नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी
आज एक नामनिर्देशन पत्र दाखल
नांदेड, दि. 2 :- महाराष्ट्र विधान परिषद , नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2016  साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी आज अपक्ष उमेदवार म्हणून निखाते संदीप विजय यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड जिल्हा स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ नांदेड कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्रे देण्याचा व स्विकारण्याचा आज शेवटचा दिवस होता.   
विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम मुदतीपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची उद्या गुरूवार 3 नोव्हेंबर 2016 रोजी छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शनिवार 5 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. यानंतर अंतिम उमेदवारी यादी निश्चित होईल.

0000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...